Video : हत्तीचा इतका भारी व्हिडीओ तुम्ही आधी पाहिला नसेल, एकदा बघाल बघतच रहाल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 14:51 IST2020-05-10T14:51:50+5:302020-05-10T14:51:58+5:30

हत्ती पाण्यात जाताना दिसतो आणि हा नजारा अंडरवॉटर कॅमेराने कैद करण्यात आला. पाण्यात तो मस्ती करतो तेही यात दिसतं.

Elephant bath in the river video goes viral api | Video : हत्तीचा इतका भारी व्हिडीओ तुम्ही आधी पाहिला नसेल, एकदा बघाल बघतच रहाल....

Video : हत्तीचा इतका भारी व्हिडीओ तुम्ही आधी पाहिला नसेल, एकदा बघाल बघतच रहाल....

हत्ती हा एक फारच भव्य, आकर्षक आणि बिनधास्त असा प्राणी आहे. हत्तींचे वेगवेगळे व्हिडीओज नेहमीच समोर येत असतात. लॉकडाऊनमुळे लोक घरात आणि हत्ती रस्त्यांवर दिसू लागले आहेत. अशात उन्हाचा पाराही वाढतो आहे. लोक दिवसातून दोन वेळा आंघोळ करत आहेत अशात एका आंघोळ करत असलेल्या हत्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हाला गारवा जाणवेल.

सुशांता नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. सोबतच लिहिले की, 'हत्तीला हे माहीत आहे की, गरमीत स्वत:ला कसं कूल ठेवायचं'. यात हत्ती पाण्यात जाताना दिसतो आणि हा नजारा अंडरवॉटर कॅमेराने कैद करण्यात आला. पाण्यात तो मस्ती करतो तेही यात दिसतं.

सोशल मीडियावरील लोकांना हा व्हिडीओ फारच पसंत पडलाय किंवा ईर्ष्याही वाटतेय. कारण ते घरात आहेत आणि हत्ती थंड पाण्यात एन्जॉय करतो आहे. हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोक शेअर करत आहेत.

Web Title: Elephant bath in the river video goes viral api