शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

Viral Video: हत्तीने केअर टेकरला लाथेने तुडवतुडव तुडवले, पण शेवटी आला भयानक ट्वीस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 3:32 PM

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून तुम्हाला सुरुवातीला धडकी भरेल. पण व्हिडीओचा शेवट पाहून थक्क व्हाल.

हत्ती शरीराने अवाढव्य प्राणी. ज्याला पाहताच धडकी भरते. पण इतर प्राण्यांप्रमाणे तो तितका आक्रमक नसतो. पण एकदा का तो चवताळला की मग त्याच्या समोर येणाऱ्याचं काही खरं नाही. हत्तीचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून तुम्हाला सुरुवातीला धडकी भरेल. पण व्हिडीओचा शेवट पाहून थक्क व्हाल (Elephant attack on caretaker video).

एका हत्ती आणि माणसाच्या फायटिंगचा हा व्हिडीओ आहे. हत्तीला माणसांवर किंवा इतर प्राण्यांवर हल्ला करताना तुम्ही पाहिलं आहे. हत्ती-हत्तीमधील फाइटिंगही तुम्ही कदाचित पाहिली असेल. पण हत्ती आणि माणसाची फाइट कधी पाहिली आहे का? हत्तीचं अवाढव्य शरीर पाहून त्याच्याशी पंगा घेण्याचा विचार कोणती व्यक्ती करेल. पण या व्हिडीओत मात्र तुम्हाला ते पाहायला मिळेल (Fight between elephant and man).

व्हिडीओत पाहू शकता छोटासा हत्ती सुरुवातीला आपल्या आईसोबत आहे. त्यानंतर तो समोर आडव्या लावलेल्या लोखंडाच्या रॉडमधून कसाबसा बाहेर पडतो. त्यानंतर तिथं जवळच एका छोट्या गादीवर एक व्यक्ती झोपलेली आहे. हा हत्ती धावत थेट त्या व्यक्तीजवळ जातो. त्या व्यक्तीला लाथा मारू लागतो. बऱ्याच वेळ अशा लाथा मारून मारून तो त्याला गादीवरून उठवतो. व्यक्तीही काही वेळाने गादीवरून उठते. पण पुन्हा गादीवर झोपते. तेव्हा हत्ती पुन्हा त्याला गादीवरून उठवण्याचा प्रयत्न करतो. दोघांमध्ये बराच वेळ अशी फायटिंग होते.

हत्ती त्या गादीसाठी त्या व्यक्तीशी लढतो. ही गादी माझी आहे, त्यावरून उठ, त्यावर तू झोपू नको, मी झोपणार असंच तो त्या व्यक्तीला सांगतो आहे. व्हिडीओ शेवटी तुम्ही पाहाल. तर काही करून हत्ती त्या व्यक्तीकडून आपली गादी मिळवतो आणि त्यावर झोपून देतो. त्यानंतर ती व्यक्तीही त्याच्या शेजारी येऊन त्या गादीवर झोपेत. दोघंही एकत्र एकाच गादीवर शांतपणे झोपतात.  व्हिडीओच्या सुरुवातीला हत्तीला व्यक्तीवर हल्ला करताना पाहून धडकी भरते. पण व्हिडीओचा शेवट मात्र क्युट आहे.

@IfsSamrat ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर