बालपण देगा देवा; पक्ष्यांना पकडण्यासाठी हत्तीच्या पिल्लाची धडपड; Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 14:11 IST2020-06-24T14:10:47+5:302020-06-24T14:11:17+5:30
हा व्हिडीओ जवळपास 60 हजार लोकांनी पाहिला.

बालपण देगा देवा; पक्ष्यांना पकडण्यासाठी हत्तीच्या पिल्लाची धडपड; Video Viral
कोरोना व्हायरसच्या संकटात अनेक नकारात्मक बातम्या समोर आल्या... पण, आता या संकटावर मात करण्याचा निर्धार प्रत्येकानं केला आहे आणि त्यात भविष्यात यशही मिळेल. कोरोना संकटात सोशल मीडियावर आपला उत्साह वाढवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आणि नेटिझन्सना त्यांनी खळखळून हसवलेही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्हाला पुन्हा लहान होऊन फुलपाखरांच्या मागे पळावेसे नक्की वाटेल.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीयोत हत्तीचं पिल्लू फुलपाखरू आणि पक्ष्यांच्या मागे बागडताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ जवळपास 60 हजार लोकांनी पाहिला. पाच हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक्स केले असून हजार लोकांनी रिट्विट केलं आहे. खरचं हत्तीच्या पिल्लाला बागडताना पाहून प्रत्येकाला आपलं बालपण नक्की आठवेल.
पाहा व्हिडीओ...
Chasing birds & butterflies💕
— Susanta Nanda (@susantananda3) June 23, 2020
Who has not done it as a kid?? pic.twitter.com/hi06kKIvG6
अन्य महत्त्वाच्या बातम्या
खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, तरीही IPL 2020 होऊ न देण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील; आखला खास प्लान
पाकिस्तानचे 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं विचारले दोन खोचक प्रश्न!
सचिन तेंडुलकरवर मात; राहुल द्रविड ठरला 50 वर्षांतील सर्वोत्तम भारतीय कसोटी फलंदाज!
भावांनो कोरोनाला लेचापेचा समजू नका; 10 क्रिकेटपटू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शाहिद आफ्रिदीचे आवाहन
गोलमाल है भाई...! काल कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला पाकिस्तानचा खेळाडू आज झाला निगेटिव्ह