प्री-वेडींग फोटोशूट करत होतं कपल, अचानक नग्न व्यक्तीने येऊन केली photobombing!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 14:34 IST2019-05-04T14:29:33+5:302019-05-04T14:34:47+5:30

काही फोटो फारच परफेक्ट आणि वेगळ्या पद्धतीने काढलेले असतात. पण कधी कधी चुकून असं काही होतं की, सामान्य फोटोशूटही जगभरात चर्चेचा विषय ठरतं.

Elderly naked man photobombs couple funny photo from pre wedding shoot goes viral | प्री-वेडींग फोटोशूट करत होतं कपल, अचानक नग्न व्यक्तीने येऊन केली photobombing!

प्री-वेडींग फोटोशूट करत होतं कपल, अचानक नग्न व्यक्तीने येऊन केली photobombing!

सद्या सगळीकडे प्री-वेडींग फोटोशूटची चांगलीच क्रेझ बघायला मिळत आहे. सतत वेगवेगळ्या सुंदर कपल्सचे सुंदर फोटो सोशल मीडियात बघायला मिळतात. काही फोटो फारच परफेक्ट आणि वेगळ्या पद्धतीने काढलेले असतात. पण कधी कधी चुकून असं काही होतं की, सामान्य फोटोशूटही जगभरात चर्चेचा विषय ठरतं. असंच काहीसं सॅन डिएगोमधील एक कपलसोबत झालं. दोघेही समुद्र किनारी फोटोशूट करत होते, अशातच एका वृद्ध काकांनी फोटोबॉम्बिंग केली. ते काकाजी फोटोत नग्न अवस्थेत आलेत. 

सोशल मीडियात हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. फोटोबॉम्बिंगचा अर्थ असा होतो की, फोटोमध्ये नको असलेलं काहीतरी कॅप्चर होणं किंवा येणं. म्हणजे काही गोष्टींमुळे एक चांगला फोटो खराब होऊ शकतो, त्याला फोटोबॉम्बिंग म्हणतात. 

सॅन डिएगोमध्ये १४ मार्चला एमी सेफ्टन आणि जेक हे दोघे प्री-वेडींग फोटोशूट करत होते. समुद्र किनारी सगळंकाही परफेक्ट होतं. कपल्सला वेडींग कार्डसाठी काही फोटो हवे होते. फोटोग्राफर ऑस्टिन व्हाइटसेल पूर्ण मेहनतीने चांगले फोटो क्लिक करता होता. पण फोटोग्राफरला त्याच्या फ्रेममध्ये असंकाही दिसलं की, तो आश्चर्यचकित झाला. त्याला दिसलं की, एमी आणि जेक यांच्या मागे फोटोत एक व्यक्ती दिसतोय, तोही नग्न अवस्थेत. 

पीपल्स मॅगझिनसोबत बोलताना एमी सेफ्टन सांगते की, 'पहिल्यांदा मी त्यांना पाहिलं तर मला धक्काच बसला. मला माझं हसू आवरता येत नव्हतं. मी स्वत:ला प्रश्न केला की, हे काय आहे? तिथे आजूबाजूला लहान मुलंही होते. पण मग मला नंतर जाणीव झाली हे भन्नाट आहे'.

एमी सांगते की, त्यांच्या फोटोग्राफरला फ्रेम बेकार करायची नव्हती. त्यामुळे तो त्या नग्न व्यक्तीच्या जाण्याची वाट बघू लागला. पण मग त्याच्या असं लक्षात आलं की, हा एक वेगळाच क्षण आहे. तो स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने काही फोटो क्लिक केले. 

कपलचं म्हणणं आहे की, सॅन डिएगो येथील हा बीच त्यांच्यासाठी अनेक दृष्टीने खास आहे. कारण त्यांच्या नात्यात या समुद्र किनाऱ्याच्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. अशाच फोटोशूटमध्ये त्या व्यक्तीचं येणंही ते गंमतीदार क्षण मानतात. 

Web Title: Elderly naked man photobombs couple funny photo from pre wedding shoot goes viral