दुबईच्या रस्त्यांवर पाळीव कुत्रे - मांजरी सोडून पळताहेत लोक, कारण असं जे नक्कीच मन हेलावून टाकेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:07 IST2026-03-10T17:06:07+5:302026-03-10T17:07:00+5:30
Dubai Abandoned Pets : इराणच्या हल्ल्यानंतर दुबईतील लोक त्यांच्या पाळीव कुत्र्यांना आणि मांजरींना रस्त्यावर सोडत आहेत. कारण असं आहे जे मनाला चटका लावून जाईल.

दुबईच्या रस्त्यांवर पाळीव कुत्रे - मांजरी सोडून पळताहेत लोक, कारण असं जे नक्कीच मन हेलावून टाकेल
Dubai Abandoned Pets : इराण आणि अमेरिका - इस्त्राइल यांच्यातील युद्धात दुबईला सुद्धा मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागतोय. इराणनेदुबईसहीत संयुक्त अरब अमीरातमधील अनेक शहरांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ले केले. अशात दुबईतून आता एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इराणच्या हल्ल्यानंतर दुबईतील लोक त्यांच्या पाळीव कुत्र्यांना आणि मांजरींना रस्त्यावर सोडून देत आहेत. याचं कारण असं आहे जे मनाला चटका लावून जाईल.
डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, दुबईतील अनेक पशु चिकित्सकांकडे पाळीव प्राण्यांच्या इच्छा मृत्युसाठी अनेकांचे फोन येत आहेत. तर देशातील अनेक पशुकल्याण सेंटरमध्ये मरण्यासाठी सोडण्यात आलेल्या पाळीव प्राण्यांची संख्या फार जास्त वाढली आहे.
सोशल मीडियावर दुबईतील असे कितीतरी फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यात कुत्रे अन्न-पाण्याशिवाय विजेच्या खांबांना बांधून सोडण्यात आले आहेत. द बार्किंग लॉट नावाच्या एका संस्थेच्या वॉलेंटिअरने सांगितलं की, बऱ्याच पेट क्लीनिकच्या डॉक्टरांनी खुलासा केलाय की, मालक निरोगी पाळीव प्राण्यांना इच्छा मरण देण्यासाठी येत आहेत. कारण त्यांना दुबईतून प्राण्यांना ट्रान्सफर करण्यासाठी कागदपत्रे करण्यात वेळ घालवणं टाळायचं आहे.
युद्धामुळे देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही लोकांनी सांगितले की, ते त्यांचे पाळीव प्राणी सीमेबाहेर सोबत नेऊ शकत नाहीत. म्हणजे अनेक प्राणी वाळवंटात मरण्यासाठी तसेच सोडले जातील. मिडल ईस्टमध्ये अजूनही बरेच ब्रिटिश नागरिक अडकून आहेत. ज्यातील १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी आपल्या देशात जाण्यासाठी दूतावासात अर्ज केले आहेत. ज्यांमध्ये त्यांच्या पाळीव प्राण्यांचा उल्लेख नाही.
मिररच्या एका रिपोर्टनुसार, दुबईमध्ये राहणाऱ्या हजारो ब्रिटिश नागरिकांना त्यांचे पाळीव प्राणी तिथेच सोडून द्यावे लागत आहेत. लोक आपले साहित्य गुंडाळून आपल्या परिवाराकडे जाण्यास तयार आहेत. पण ज्यांचा लेकरांसारखा सांभाळ केला, ज्यांचे लाड केले असे आपले पाळीव प्राणी ते तिथेच रस्त्यांवर सोडत आहेत.