Dolphin Attack Video: संतापलेल्या डॉल्फीनने ट्रेनरवर केला हल्ला, बघा थरारक व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 10:50 IST2022-04-14T10:49:59+5:302022-04-14T10:50:24+5:30
Dolphin attack video : व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका ट्रेनर डॉल्फीनला कोरिओग्राफ करत होती. पण रागावलेल्या डॉल्फीनने अचानक तिच्यावर हल्ला केला.

Dolphin Attack Video: संतापलेल्या डॉल्फीनने ट्रेनरवर केला हल्ला, बघा थरारक व्हिडीओ
Dolphin Attacks A Trainer at Miami Seaquarium: एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका डॉल्फीनने तिच्या ट्रेनरवर अचानक हल्ला केला. ही घटना मियामी सीक्वेरिअमची आहे. डॉल्फीनने अचानक ट्रेनरवर हल्ला केला आणि तिला याता इजा झाली. शनिवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पीपुल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्सने शेअर केला आहे.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका ट्रेनर डॉल्फीनला कोरिओग्राफ करत होती. पण रागावलेल्या डॉल्फीनने अचानक तिच्यावर हल्ला केला. जेव्हा ट्रेनर दुसरीकडे जात होती तेव्हा डॉल्फीनने येऊन तिला धक्काही दिला.
न्यूयॉर्क पोस्टनुसार, हा व्हिडीओ फोटोग्राफर शॅनन कारपेंटरने रेकॉर्ड केला होता. जो शोमध्ये सहभागी होता. व्हिडीओत डॉल्फीन पाण्यात असलेल्या ट्रेनरवर हल्ला करताना दिसत आहे. दुसरीकडे ट्रेनर स्वीमिंग करत पूलच्या दुसऱ्या बाजूला बाहेर निघताना दिसत आहे. काही सेकंदानंतर बघू शकता की, एक व्यक्ती ट्रेनरच्या बचावासाठी येतो. त्यानंतर ट्रेनरला लगेच हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं.
BREAKING: This chilling video shows a dolphin attacking a trainer, tossing her body violently through the water, & reportedly sending her to the hospital.
— PETA (@peta) April 12, 2022
Time is up for @MiamiSeaquarium—it must send the animals to seaside sanctuaries! pic.twitter.com/YN27DGygZe
रिपोर्टनुसार, ट्रेनरला फार गंभीर इजा झाली नाही. मियामी सीक्वेरिअमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सनडान्स नावाची डॉल्फीन पाण्यात ट्रेनरला घाबरली. ही दोघांसाठीही एक असजह बाब होती आणि डॉल्फीनने रूटीन एक्सरसाइज सोडून अचानक ट्रेनरवर हल्ला केला.
या घटनेने डॉल्फीनला कैद करणे आणि प्रेक्षकांसमोर तिला परफॉर्म करायला सांगणे यावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. डॉल्फीने प्रोजेक्टने असंही सांगितलं की, या घटनेमुळे हे समोर आलं आहे की, डॉल्फीन आणि इतर व्हेलला कैद केलं जाऊ शकत नाही.