प्लास्टिकच्या बॉटलमध्ये अडकलं कुत्र्याचं तोंड, वेळ आली कापण्याची...अन् मग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 20:03 IST2021-10-07T20:01:02+5:302021-10-07T20:03:58+5:30
अनेक वेळा प्लास्टिक प्राण्यांसाठी मोठ्या अचडणीचं कारण ठरतं. असंच काहीसं घडलं एका कुत्र्यासोबत. या कुत्र्याच्या डोक्यात प्लास्टिकची बाटली अडकली. ज्यामुळे कुत्र्याचा जीव जाण्याची वेळ आली.

प्लास्टिकच्या बॉटलमध्ये अडकलं कुत्र्याचं तोंड, वेळ आली कापण्याची...अन् मग
जगभरात अजूनही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे केवळ माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही त्रास सहन करावा लागतो. बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की, अनेक वेळा प्लास्टिक प्राण्यांसाठी मोठ्या अचडणीचं कारण ठरतं. असंच काहीसं घडलं एका कुत्र्यासोबत. या कुत्र्याच्या डोक्यात प्लास्टिकची बाटली अडकली. ज्यामुळे कुत्र्याचा जीव जाण्याची वेळ आली.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये, काही सायकलस्वार फिरायला बाहेर असल्याचं दिसतं. पण या दरम्यान त्यांना वाटेत एक कुत्रा दिसतो, ज्याचं डोकं एका कोल्डड्रिंकच्या बाटलीत अडकलेलं असतं. कुत्र्याचा जीव धोक्यात असल्याचे पाहून तिन्ही सायकलस्वार त्याच्याजवळ जातात. आणि ती अकडलेली बाटली कापून त्याची सुटका करतात. डोक्यातून बाटली निघाल्यानंतर कुत्र्याला खूप बरं वाटतं.
Heroes save this dog stuck in plastic…
— Mack & Becky Comedy (@MackBeckyComedy) October 5, 2021
Look at how grateful he is… 😭❤️ pic.twitter.com/ETFockNzXJ
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण व्हिडिओमधल्या तिघांचंही कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ Mack & Becky Comedy ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. बातमी लिहीपर्यंत हा व्हिडिओ ५ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला होता.