मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 17:23 IST2025-07-16T17:21:27+5:302025-07-16T17:23:32+5:30
व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
Viral Video: कुत्रा आणि मांजराचे भांडण सर्वश्रृत आहे. कुठेही मांजर दिसली की, कुत्रा तिच्या मागे लागतो. सोशल मीडियावर अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. कुत्र्यांची टोळी एका मांजराच्या मागे धावत गल्लीत शिरते, पण तिथे गेल्यावर त्यांना सत्य समजताच त्यांची पळताभुई होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ३ जुलै रोजी रात्री ११ वाजता घडली. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक बिबट्या रस्ता ओलांडताना दिसतो. तिथे भटकणारी कुत्र्यांची टोळी (डोगेश गँग) याला मांजर समजून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. पण, जेव्हा त्यांना समजते की, तो बिबट्या आहे, जीव वाचवण्यासाठी डॉगेश गँग दुसऱ्याच क्षणी उलट्या दिशेने धावायला लागते.
They thought it's just a CAT😭
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 15, 2025
pic.twitter.com/EO6P9Z4ODi
@gharkekalesh या हँडलवरून व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, व्हिडिओला आतापर्यंत १३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर १९ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. याशिवाय, कमेंट सेक्शनमध्ये युजर्स डॉगेश टोळीची फजिती पाहून पोट धरुन हसत आहेत.