Video ...अन् कुत्र्याने मालकासोबत २ हजार फुटांवरून खाली उडी घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 14:51 IST2020-03-10T14:47:35+5:302020-03-10T14:51:15+5:30

कैनाइन या त्याच्या मालकाने कजुजाला जवळ घेत २ हजार फुटांवरून उडी मारली.

Dog jumps off 2 thousands foot height video goes viral api | Video ...अन् कुत्र्याने मालकासोबत २ हजार फुटांवरून खाली उडी घेतली

Video ...अन् कुत्र्याने मालकासोबत २ हजार फुटांवरून खाली उडी घेतली

तसे तर सोशल मीडियात कुत्र्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेला एक व्हिडीओ आधीच्या व्हिडीओंपेक्षा अधिक भारी आहे. कारण या कुत्र्याने तब्बल २ हजार ३०० फूट उंचावरून मालकासोबत उडी घेतली.

कैनाइन या त्याच्या मालकाने कजुजाला जवळ घेत २ हजार फुटांवरून उडी मारली. कजुजा शांतपणे त्यांच्या कुशीत बसला होता. आणि अचानक पॅराशूट ओपन झालं. दोघांनीही निसर्गसौंदर्याचा आनंद घेत लॅण्ड केलं.

दोघांनी पॅराशूटच्या मदतीनं हा कारनामा केलाय. सोशल मीडियावर या कुत्र्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. या कुत्र्याने आपल्या मालकासोबत २ हजार फुटांवर जाऊन पॅराशूट जंप केली. या कुत्रानं पॅराग्लायडिंग करण्याचं धाडसाचं यूजर्सकडून कौतुक केलं जात आहे.

कजुजा असं या कुत्र्यांचं नाव आहे. यावेळी कुठेही हा कुत्रा घाबरला नव्हता. हा व्हिडीओ ५ नोव्हेंबर २०१९ रोजी युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. ८ हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ३०० पेक्षा जास्त लोकांनी लाईक केला आहे. 

Web Title: Dog jumps off 2 thousands foot height video goes viral api