आधी छोट्या टॉमीला घाबरवले पण नंतर आला भला मोठा कुत्रा अन् बकरीचे केले 'हे' हाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 18:21 IST2021-12-13T18:19:43+5:302021-12-13T18:21:15+5:30
कुत्रा आणि बकरी यांच्यातील मजेदार भांडणाचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे. इन्स्टाग्रामवर dogs_lovers0017 या नावाने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

आधी छोट्या टॉमीला घाबरवले पण नंतर आला भला मोठा कुत्रा अन् बकरीचे केले 'हे' हाल...
कुत्रा आणि बकरी यांच्यातील मजेदार भांडणाचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे. इन्स्टाग्रामवर dogs_lovers0017 या नावाने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ७ लाख ९३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 24 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक बकरी एका कुत्र्याला त्याच्या डोक्यावर जोरात धडक मारते, त्यानंतर कुत्रा मागे जातो, पण त्यानंतरही तो कुत्रा पुन्हा पुढे येतो, आणि त्यानंतर बकरी पुन्हा एकदा त्याला धडक मारते. ती कुत्र्याला खूप घाबरवण्याचा प्रयत्न करते, पण तेवढ्यात अचानक एक महाकाय कुत्रा शेळीसमोर येतो, त्यानंतर शेळीला काय करावं सुचत नाही. आणि ती तिथून पळ काढते.
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की ‘जेव्हा तुमचा मोठा भाऊ मदतीला येतो’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘त्या कुत्र्याचा आणि त्या बकरीच्या भांडणात मोठा कुत्रा हिरो ठरला’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘म्हणून नेहमी मोठ्यांचा आदर करा, तेच तुमच्यासाठी फायद्याचं असेल’.