शुक्रवारी 13 सप्टेंबरपासून ट्विटरवर अचानक बॉलिवूड अभिनेता विकी कौशल चर्चेमध्ये आला आहे. कारण आहे व्हायरल होणारा एक फोटो. तुम्हाला वाटलं असेल की विकीचा एखादा फोटो व्हायरल होत आहे. पण नाही... व्हायरल होणारा हा फोटो आपल्या अदांनी नेटकऱ्यांना घायाळ करणाऱ्या 'विंक गर्ल' प्रिया प्रकाश वॉरियरचा आहे. पण प्रियाच्या या फोटोमध्ये अनेक नेटकऱ्यांना विकी कौशल दिसत आहे... कसा? पाहा तुम्हीच... तुम्हालाही दिसतोय का? 

या यूजरने सर्वात आधी ट्विट केला फोटो

प्रिया प्रकाशचा व्हायरल होणारा हा फोटो @Sohni_Bose नावाच्या एका यूजरने शेअर केला आहे. तसेच फोटो शेअर करताना असं कॅप्शन लिहिलं आहे की? 'मला माफ करा, पण मला असं वाटलं की, हा विकी कौशलचा फोटा आहे.' असं म्हणतातच... इतर नेटकऱ्यांनाही या फोटोमध्ये 'उरी' फेम विकी कौशल दिसू लागला. 

'नॅशनल क्रश' बनली होती प्रिया...

कदाचितच कोणी असेल जे प्रियाला ओळखत नसेल. 2018मध्ये व्हेलेटाइन वीक दरम्यान प्रियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळेच प्रिया कोट्यवधी भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनली होती. मल्याळम चित्रपटातून डेब्यू करणारी प्रिया आता रातोरात स्टार झाली होती. 

फक्त दीपिका पादुकोन आणि विकी कौशलला करते फॉलो

महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिया स्वतः विकी कौशलची फॅन आहे. इंस्टाग्रामवर प्रियाचे 73 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असून ती फक्त 100 लोकांना फॉलो करते. आणखी एक गोष्ट म्हणजे, प्रिया बॉलिवूडच्या फक्त दोन स्टार्सना फॉलो करते. एक म्हणजे, दीपिका पादूकोन आणि दुसरा विकी कौशल. 

पाहा नेटकऱ्यांना कोण दिसलं या फोटोमध्ये? 


Web Title: Do you also feel its vicky kaushal in this viral picture not priya prakash varrier
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.