काही सेकंदात 3 कोटी रुपयांचे फटाके जळून खाक; वातावरणात धुराचे लोट, पाहा Video...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 13:42 IST2025-10-21T13:41:29+5:302025-10-21T13:42:06+5:30
Diwali News: हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काही सेकंदात 3 कोटी रुपयांचे फटाके जळून खाक; वातावरणात धुराचे लोट, पाहा Video...
Diwali News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी फटाक्यांचे बाजार पाहायला मिळतात. पण, अनेकदा कुणाच्यातरी चुकीमुळे अशा बाजारांना आग लागल्याच्या घटनाही घडतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला मोठा धक्का बसेल. या व्हिडिओत दिसणारं दृश्य क्वचितच पाहायला मिळतं.
दिवाळीनिमित्त सोशल मीडियावर फटाक्यांचे व्हिडिओ ट्रेंडमध्ये आहेत. परंतु, त्यातला एक व्हिडिओ लोकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओसोबत करण्यात आलेला दावा चकित करणारा आहे. या व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा स्फोट होताना दिसतोय. मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे परिसरात काळ्या धुराचे लोट उठताना दिसत आहेत.
यूपी के फतेहपुर में पटाखा मार्केट जलकर खाक, 70 दुकानों में 3 करोड़ रुपए के पटाखे स्वाहा, दो किलोमीटर तक आवाज, धुएं के गुबार, 50 से ज्यादा वाहन नष्ट, कई घायल। pic.twitter.com/Uv8tJSNLiH
— The Advocate (@theadvocate26) October 20, 2025
व्हिडिओ शेअर करताना असा दावा करण्यात आला आहे की, हा प्रकार उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील फटाका बाजारात घडला आहे. फटाका मार्केटला आग लागल्यामुळे 70 दुकाने नष्ट झाली. यामध्ये सुमारे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाले. ही घटना इतकी भीषम होती की, 2 किलोमीटरपर्यंत आवाज आणि धुराचे ढग दिसत होते.
या धक्कादायक घटनेत 50 पेक्षा जास्त वाहनेही जळून खाक झाल्याचा दावा केला जातोय. हा व्हिडिओ ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर @theadvocate26 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला 1 लाख 88 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिलं, “चांगलीच दिवाळी सुरू आहे, आज कित्येकांना झोप येणार नाही.” तर दुसऱ्यानं म्हटलं, “अत्यंत दुर्दैवी घटना आहे, अशा ठिकाणी खबरदारी घेणं आवश्यक आहे.”