बॅटिंग मिळाली नाही, रागाच्या भरात तरुणाने पिचवर फिरवला नांगर, पाहा Video...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:12 IST2025-12-25T18:11:46+5:302025-12-25T18:12:13+5:30
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॅटिंग मिळाली नाही, रागाच्या भरात तरुणाने पिचवर फिरवला नांगर, पाहा Video...
Viral Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हसवणारे असतात, तर काही आश्चर्यचकित करणारे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?
तुम्ही गावात राहत असाल किंवा कधी गावाकडील आयुष्य अनुभवले असेल, तर तुम्हाला माहीत असेल की, तिथे खेळण्यासाठी स्वतंत्र मैदान किंवा पार्क फारसे नसतात. अशा वेळी मोकळ्या शेतातच पिच तयार करून क्रिकेट खेळले जाते.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, काही तरुण शेतात क्रिकेट खेळत आहेत. मात्र, पिचवर अचानक एक तरुण ट्रॅक्टर घेऊन येतो आणि संपूर्ण पिच नांगरायला सुरुवात करतो. व्हिडीओ शूट करणारा व्यक्ती हसत सांगतो की, त्याला बॅटिंग मिळाली नाही, म्हणून त्याने पिच नांगरुन टाकले.
कुठे व्हायरल झाला व्हिडीओ?
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरील ‘ghantaa’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले असून, नेटकऱ्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, हा सगळ्यात समाधान देणारा क्षण आहे! दुसऱ्याने म्हटले, मी नाही, तर कुणीच नाही! तिसऱ्या युजरची कमेंट केली, न खेळणार, न खेळू देणार!