Viral Video: लग्नात दीराने अन् वहिनीने केला भन्नाट डान्स, उपस्थितांची मने तर जिंकलीच अन् नेटकरीही फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 08:15 IST2022-06-06T08:11:42+5:302022-06-06T08:15:00+5:30

सोशल मीडियावर (Social Media) लग्नातील एक डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात दीर-वहिनी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. दोघांच्या डान्स परफॉमन्सने उपस्थितांची मनं जिंकली आहेत.

devar bhabhi dancing in wedding video goes viral on internet | Viral Video: लग्नात दीराने अन् वहिनीने केला भन्नाट डान्स, उपस्थितांची मने तर जिंकलीच अन् नेटकरीही फिदा

Viral Video: लग्नात दीराने अन् वहिनीने केला भन्नाट डान्स, उपस्थितांची मने तर जिंकलीच अन् नेटकरीही फिदा

देशात सध्या लग्नाचा (Marriage Dance Video Viral) सीजन सुरू आहे. भारतात लग्नात जेवणाबरोबर डीजेवर मनसोक्त डान्स केला जातो. मग लहान मुलं असो वा वयोवृद्ध..संधी मिळताच लोक फ्लोअरवर डान्स सुरू करतात. सोशल मीडियावर (Social Media) लग्नातील एक डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात दीर-वहिनी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. दोघांच्या डान्स परफॉमन्सने उपस्थितांची मनं जिंकली आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्न सोहळ्याच डान्सचा माहोल तयार झाला आहे. स्टेजवर डीजे लावला आहे आणि सर्वजण डान्स करीत आहेत. काही वेळानंतर स्टेजवर दीर-वहिनी येतात. आणि हरियाणवी गाण्यावर जबरदस्त डान्स करतात. डान्सची सुरुवात दीरापासून होते. सुरुवातील वहिनी शांतपणे त्याच्याकडे पाहत असते. काही वेळानंतर वहिनीदेखील नाचायला सुरुवात करते.

  

या दोघांच्या डान्सने लोकांची मनं जिंकली आहे. दीर-वहिनीची हा डान्स Prince Saini Hr20 नावाच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे. बहिणीच्या लग्नात दीर-वहिनीने डान्स केल्याचं या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

Web Title: devar bhabhi dancing in wedding video goes viral on internet