Desi jugaad to keep locusts away tiktok video is massively viral myb | टोळांची धाड पळवून लावण्यासाठी शेतकऱ्याने केलाय भन्नाट जुगाड! पाहा व्हायरल व्हिडीओ

टोळांची धाड पळवून लावण्यासाठी शेतकऱ्याने केलाय भन्नाट जुगाड! पाहा व्हायरल व्हिडीओ

टोळांची धाड आल्यामुळे उत्तर भारतातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकांना वाचवण्याासाठी धडपड करताना दिसून येत आहेत. एका शेतकऱ्याने आपल्या शेताला टोळांपासून वाचवण्यासाठी चांगलीच शक्कल लढवली आहे.  भांडी, ड्रम, काठी अशा वेगवेगळ्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून शेतकरी आपल्या पिकांचे रक्षण करत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तरप्रदेशातील झांशी जिल्ह्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. तसंच #Jugad , #JugadRocks  असं कॅप्शनमध्ये लिहिल आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शेतकऱ्याने शेताच्या मधोमध एक कृत्रिम विमान तयार केलं आहे. जसं  पिकांना पक्षांपासून  वाचवण्यासाठी बुजगावणं तयार केलं जातं त्याचप्रमाणे हा जुगाड केला आहे.  हे विमान तयार करण्याासाठी  बॉटल, पंखा आणि एका डब्याचा वापर केला आहे. 

Fear of locust raids entering the district after Morshi, Arvi | मोर्शी, आर्वीनंतर टोळ धाड जिल्ह्यात दाखल होण्याची भीती

हवेच्या प्रवाहाने हा पंखा सुरू होताच  ड्रम जोरजोरात वाजू लागतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहे.  टिकटॉकवर या व्हिडीओला १,५ मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.  तसंच ७ हजारांपेक्षा जास्त कमेंट्स केल्या आहेत.  सोशल मीडियावर लोकांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

सावधान! हा फोटो वॉलपेपर ठेवाल तर होईल मोठं नुकसान, एका ट्विटर यूजरने दिला इशारा!

खतरनाक! अंगावर आलेला सिंह म्हशीने असा काही घेतला शिंगावर, बघा थरारक व्हिडीओ...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Desi jugaad to keep locusts away tiktok video is massively viral myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.