सावधान! हा फोटो वॉलपेपर ठेवाल तर होईल मोठं नुकसान, एका ट्विटर यूजरने दिला इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 02:47 PM2020-06-02T14:47:20+5:302020-06-02T14:47:42+5:30

@UniverseIce नावाच्या ट्विटर यूजरने हा फोटो शेअर केला असून त्याने इशारा दिला आहे की, कृपया हा फोटो वॉलपेपर बनवू नका.

twitter user universeice status goes viral api | सावधान! हा फोटो वॉलपेपर ठेवाल तर होईल मोठं नुकसान, एका ट्विटर यूजरने दिला इशारा!

सावधान! हा फोटो वॉलपेपर ठेवाल तर होईल मोठं नुकसान, एका ट्विटर यूजरने दिला इशारा!

Next

हा फोटो लक्ष देऊन बघा. काही गडबड दिसते का? जर हा फोटो भारी असल्याने वॉलपेपर बनवण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण या फोटोबाबत एका व्यक्तीने अजब दावा केलाय.

@UniverseIce नावाच्या ट्विटर यूजरने हा फोटो शेअर केला असून त्याने इशारा दिला आहे की, कृपया हा फोटो वॉलपेपर बनवू नका. खासकरून सॅमसंग यूजर्स. याने तुमचा फोन क्रॅश होऊ शकतो. हे अजिबात ट्राय करू नका. जर तुम्हाला कुणी हा फोटो पाठवला तर दुर्लक्ष करा. दरम्यान ट्विटरवर या फोटोला 12.8 हजार लाइक्स आणि 11.9 हजार रिट्विट मिळाले आहेत.

यूजरने पुढच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'ही गंमत नाही. कृपया हे ट्राय करू नका. मी आशा करतो की, कुणीतरी फोन असा वॉलपेपरच्या नुकसानापासून वाचवण्यासाठी याच्या क्रॅश मेकॅनिज्मला समजेल. डेव्हलपर्स याचा अभ्यास करा, वॉलपेपरचा खरा फोटो लिंत ट्विटमध्ये अटॅच केलाय'.

यूजरने लिहिले की, 'जेव्हा मी ओरिजनल फोटोला Weibo वर अपलोड केलं, त्याचा रंग बदलला. पण ट्विटरवर असं झालं नाही. फोटोचा खेळ लोकांच्या लक्षात येत नाहीये. काही लोक हा ट्राय करणं टाळत आहेत. तर काहींना हे गंमत वाटत आहे.

काही लोक असेही असतात ज्यांना एखादी गोष्ट करू नका असं सांगितलं तर ते तीच गोष्ट हटकून करतात. मग बसतात बोंबलत.

Web Title: twitter user universeice status goes viral api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.