VIDEO : महिलेने एक्स बॉयफ्रेन्डच्या चेहऱ्यावर चहा फेकण्याची दिली ऑर्डर, डिलीवरी बॉयने तेच केलं आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 15:03 IST2021-02-15T15:00:04+5:302021-02-15T15:03:46+5:30
ही घटना आहे चीनच्या शांगडोंगमधील. महिलेने एक कप चहा पोहोचवण्याची ऑर्डर दिली होती. पण त्या ऑर्डरसोबत जी रिक्वेस्ट केली गेली होती ती फार वेगळी होती.

VIDEO : महिलेने एक्स बॉयफ्रेन्डच्या चेहऱ्यावर चहा फेकण्याची दिली ऑर्डर, डिलीवरी बॉयने तेच केलं आणि...
प्रेम असलं की, दोन व्यक्तींमध्ये भांडणंही होत असतात. कपल्समध्ये भांडणे होतच राहतात. पण अनेकदा हे भांडण इतकं वाढतं की, नातं तुटतं. अनेक लोक यातून बाहेर निघतात, तर काही लोक आपल्या एक्सला धडा शिकवण्याच्या प्लॅन करतात. चीनमधून अशीच एक घटना समोर आली आहे.
ही घटना आहे चीनच्या शांगडोंगमधील. महिलेने एक कप चहा पोहोचवण्याची ऑर्डर दिली होती. पण त्या ऑर्डरसोबत जी रिक्वेस्ट केली गेली होती ती फार वेगळी होती. महिलेने तिच्या एक्स बॉयफ्रेन्डला दुधाचा चहा डिलीवर करण्याची आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकण्याची रिक्वेस्ट केली होती. असे सांगितले जात आहे की, ती तिच्या एक्सवर फार रागावलेली होती. (हे पण वाचा : बोंबला! नवऱ्यानं ज्या महिलांच्या फोटोला लाईक केलं होतं; त्याची प्रिंट काढली अन् दिलं व्हॅलेंनटाईन गिफ्ट)
मीडिया रिपोर्टनुसार, महिलेने लिहिले होते की, चहा चांगला असण्याची गरज नाही. फक्त त्याच्या चेहऱ्यावर व्यवस्थित फेकावा. आता डिलिवरी बॉयने तिने सांगितल्याप्रमाणे कामही केलं. त्याने महिलेच्या सांगण्यानुसार, दुधाचा चहा तिच्या एक्स बॉयफ्रेन्डच्या चेहऱ्यावर फेकला. सोबतच त्याचा ग्राहकाकडून करण्यात आलेल्या रिक्वेस्टची पावतीही देण्यात आली. (हे पण वाचा : व्हॅलेंटाईन डे ला डेटसाठी एक्स गर्लफ्रेन्डने दिला नकार, प्रियकराने केलं अपहरण आणि मग.....)
या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, डिलिवरी बॉयने नंतर माफीही मागितली. त्याने सांगितले की, त्याने ग्राहकाच्या आदेशानुसार काम केलं. त्याने त्या व्यक्तीला चेहरा स्वच्छ करण्यासाठी कपडाही दिली. फूड कंपनीने सांगितले की, याची चौकशी केली जाईल.