मक्याच्या कणसावर टाकलं चॉकलेट, नेटीझन्स म्हणाले...आता हेच बाकी राहिलं होतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 15:32 IST2021-11-19T15:29:14+5:302021-11-19T15:32:27+5:30

एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने स्वीट कॉर्नचा समावेश असलेली एक विचित्र रेसिपी तयार केली आणि त्यामुळे नेटिझन्सची निराशा झाली. हा व्हिडिओ फूड व्लॉगर अनिकेत लुथराने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Delhi street food vendor makes chocolate corn netizens gets angry | मक्याच्या कणसावर टाकलं चॉकलेट, नेटीझन्स म्हणाले...आता हेच बाकी राहिलं होतं!

मक्याच्या कणसावर टाकलं चॉकलेट, नेटीझन्स म्हणाले...आता हेच बाकी राहिलं होतं!

तुम्ही सर्वांनी थोडे बटर, मीठ आणि चिमूटभर चिली फ्लेक्स असलेले स्वीट कॉर्न पाहिले असेलच. हा स्वादिष्ट नाश्ता सर्वांनाच आवडतो. पण एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने स्वीट कॉर्नचा समावेश असलेली एक विचित्र रेसिपी तयार केली आणि त्यामुळे नेटिझन्सची निराशा झाली. हा व्हिडिओ फूड व्लॉगर अनिकेत लुथराने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, विक्रेता वाफवलेलं कणीस घेऊन त्यावर लोणी लावत आहे. मग तो मोठ्या प्रमाणात चॉकलेट सिरप आणि मलई ओततो. ते अजून संपलेले नाही! दुकानदारही त्यावर काही मसाले आणि लिंबू टाकतो. कॅप्शननुसार, स्ट्रीट स्टॉल पूर्व दिल्लीमध्ये आहे.

आतापर्यंत या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ काही लोकांची खूप निराशा करत आहे, तर काही लोक या डिशची टेस्ट घेण्यासाठी उत्सुक आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले, ‘कोण असं कॉर्न चॉकलेटसोबत मसाला खातं’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘एकदा खायला हरकत नाही,’ अजून एकाने लिहिले, ‘इतका विचित्र कॉम्बो कोण ठेवतो’, व्हिडिओच्या कमेंट्समध्ये बरेच इमोजी देखील दिसत आहेत.

Web Title: Delhi street food vendor makes chocolate corn netizens gets angry