भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 09:09 IST2025-10-12T09:09:06+5:302025-10-12T09:09:43+5:30
कंपनीच्या सीईओने सर्व कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला, ज्यामध्ये त्यांना दिवाळीसाठी नऊ दिवसांची सुटी मिळणार असल्याची माहिती दिली. या बातमीने कर्मचारी खूपच आनंदी झाले.

भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
कंपनीने जास्त काम दिलं की कर्मचारी कंटाळतात. कधी कधी कर्मचाऱ्याच्या सुट्या देखील कामामुळे रद्द केल्या जातात. अशातच एक कंपनी आता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. दिल्लीतील एका पीआर कंपनीच्या सीईओने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला, ज्यामध्ये त्यांना दिवाळीसाठी नऊ दिवसांची सुटी मिळणार असल्याची माहिती दिली. या बातमीने कर्मचारी खूपच आनंदी झाले. एलिट मार्के कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने लिंक्डइनवर म्हटलं की, "लोक अनेकदा कामाचं ठिकाण आणि कंपनी कल्चरबद्दल बोलतात, परंतु येथे, कर्मचाऱ्यांच्या आनंदाची खरोखर काळजी घेतली जाते."
एक चांगलं वर्क कल्चर असलेली कंपनी तिच असते जी तिच्या कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि कल्याणाला प्राधान्य देते. कंपनीचा असा विश्वास आहे की, जेव्हा कर्मचारी आनंदी आणि समाधानी असतात तेव्हा संस्था नवीन कल्पनांसह भरभराटीला येते आणि विकास होतो. कर्मचाऱ्याने स्पष्ट केलं की, कंपनीने सर्वांना त्यांच्या कुटुंबासह सण साजरा करण्यासाठी वेळ दिला.
कंपनीचे संस्थापक आणि सीईओ रजत ग्रोव्हर यांचं कौतुक करताना म्हटलं की, "कर्मचाऱ्यांच्या कल्याणाची खरोखर काळजी घेणाऱ्या संस्थेत काम करणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे." त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत सण साजरा करण्यासाठी कंपनीने कशी सुटी दिली हे स्पष्ट केलं. एका ईमेलमध्ये कर्मचाऱ्यांना नऊ दिवसांच्या सुटीचा पूर्णपणे आनंद घेण्याचं आणि ऑफिसच्या ईमेलपासून दूर राहण्याचं आवाहन केलं.
सीईओच्या हलक्याफुलक्या पण चांगल्या सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनामुळे कर्मचाऱ्यांना आराम करण्यास, कुटुंबीयांसोबत आनंद साजरा करण्यास आणि भरपूर मिठाई खाण्यास प्रोत्साहन दिलं आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, "सामान्यतः असे अपडेट्स पाठवणाऱ्या एचआर टीमलाही यामुळे आश्चर्य वाटलं. नवीन नियुक्त्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ही एक आनंददायी भेट म्हणून स्वीकारली आहे."