हरणाने फुटबॉल खेळत केला गोल अन् केलं सेलिब्रेट, कसं? पाहा हा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 18:49 IST2021-12-14T18:23:33+5:302021-12-14T18:49:12+5:30
हरिण (Deer video) शिंगासह फुटबॉल खेळताना (Deer playing football) दिसत आहे. फक्त तो फुटबॉल खेळत नाही तर अगदी गोल करतो आणि त्यानंतर सेलिब्रेशनही करताना दिसतो (Deer football goal).

हरणाने फुटबॉल खेळत केला गोल अन् केलं सेलिब्रेट, कसं? पाहा हा व्हिडिओ
आपल्याला आनंद झाला, यश मिळालं की तो साजरा करण्याची आपली एक पद्धत असते. पण कधी कोणत्या प्राण्यांना (Animal video) असा आनंद साजरा करताना पाहिले आहे का? असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हरिण (Deer video) शिंगासह फुटबॉल खेळताना (Deer playing football) दिसत आहे. फक्त तो फुटबॉल खेळत नाही तर अगदी गोल करतो आणि त्यानंतर सेलिब्रेशनही करताना दिसतो (Deer football goal).
एका पार्कमध्ये हे हरिण एकटंच फुटबॉल खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ@MorissaSchwartz ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. फुटबॉल म्हणजे जो पायांनी खेळला जातो. पण हे हरिण आपल्या शिंगांनी फुटबॉल खेळतं शिंगांच्या मदतीने हरिण फुटबॉल गोलपोस्ट पर्यंत घेऊन जातो आणि गोल करतो. हा गोल झाल्यानंतर उड्या मारत त्याचं सेलिब्रेशनही हरिण करताना दिसत आहे.
हरणाचं खेळणं, त्याचं जिंकणं आणि त्याने आनंद व्यक्त करणं हे पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. अगदी माणसांप्रमाणे उड्या मारून तो आपला आनंद व्यक्त करताना दिसतो आहे. लोकांना हरिणाची ही सेलिब्रेशन स्टाईल भयंकर आवडली आहे. फुटबॉल खेळल्यानंतर हरिण पुन्हा जंगलात जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना गोल इतकंच कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल झाला आहे.
Goal!! ⚽️ pic.twitter.com/Hz9yIVbJzB
— Morissa (Dr. Rissy) Schwartz (@MorissaSchwartz) December 13, 2021