Viral Video: रस्त्यावर मेलेलं हरिण पडलेलं, मात्र पुढे जे झालं ते पाहुन लोक म्हणाले या हरिणाला ऑस्कर द्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 20:30 IST2022-05-11T20:12:01+5:302022-05-11T20:30:12+5:30
प्राणी कधी अभिनय करु शकतात ते ही जंगली प्राणी यावर तुमचा विश्वास बसेल का? पण असं झालं आहे. तुम्ही हे पाहु शकता. त्यासाठी पाहा व्हिडिओ...

Viral Video: रस्त्यावर मेलेलं हरिण पडलेलं, मात्र पुढे जे झालं ते पाहुन लोक म्हणाले या हरिणाला ऑस्कर द्या
माणसाला बुद्धी असते पण प्राण्यांना नसते. हरिणासारखे तर प्राणी निरागस असतात असा अनेकांचा समज आहे. पण प्राणी कधी अभिनय करु शकतात ते ही जंगली प्राणी यावर तुमचा विश्वास बसेल का? पण असं झालं आहे. तुम्ही हे पाहु शकता. त्यासाठी पाहा व्हिडिओ...
व्हिडिओत तुम्ही पाहु शकता एक हरिण रस्त्यावर मेलं आहे. एक व्यक्ती कारमधुन उतरुन ते रस्त्यावरुन बाजुला करायला जातो. त्यासाठी तो कार्डबोडचा बॉक्स घेतो आणि त्या हरणाला सरकवत सरकवत रस्त्याच्या कडेला घेऊन जातो. पण तितक्यात ते हरिण उठतं आणि धावुन पसारही होतं.
earthtechonology या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ३.२ मिलियन व्हिव्ज मिळाले आहेत. ३२ हजार लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. लोकांना या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक हा व्हिडिओ पाहुन खुप हसत आहेत. अनेकांनी यावर या हरिणाला ऑस्कर दिला पाहिजे अशी कमेंट केली आहे.