Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 14:00 IST2025-12-19T13:59:55+5:302025-12-19T14:00:54+5:30
Video - गाझीपूर-वाराणसी महामार्गावरील एका जुन्या आणि लोकप्रिय ढाब्यावर ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या जेवणात एक मेलेला उंदीर आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे, ज्यामुळे जेवणाच्या ठिकाणांच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गाझीपूर-वाराणसी महामार्गावरील एका जुन्या आणि लोकप्रिय ढाब्यावर ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या जेवणात एक मेलेला उंदीर आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
१८ डिसेंबर २०२५ रोजी ही घटना घडली. काही लोक गाझीपूर-वाराणसी महामार्गावरील जिल्ह्यातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध ढाब्यापैकी एक असलेल्या सम्राट ढाब्यावर जेवायला थांबले होते. जेव्हा त्यांनी जेवणासोबत दही ऑर्डर केलं तेव्हा दह्याची प्लेट पाहून त्यांना मोठा धक्का बसला. दह्याच्या मध्यभागी एक मेलेला उंदीर होता. ग्राहकांनी ताबडतोब ढाबाच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली आणि या गंभीर निष्काळजीपणाचा निषेध केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दह्याच्या ताटात उंदीर पडल्याचा व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला.
फिलहाल FIR दर्ज नहीं, लेकिन प्रशासन ने सख्त कार्रवाई के संकेत दिए हैं।
— BitterTruth (@BitterTruth120) December 19, 2025
गाजीपुर में खाने के साथ घिनौना सच 🤢 |
ढाबे की लापरवाही उजागरयूपी के गाजीपुर-वाराणसी हाईवे स्थित मशहूर सम्राट ढाबे में दही भल्ले की प्लेट में मरा हुआ चूहा निकलने से हड़कंप मच गया।
खाना खाते वक्त ग्राहकों ने… pic.twitter.com/HdJhZntBqq
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला, विशेषतः महामार्गावरील प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांनी ढाबाच्या स्वच्छतेवर आणि अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि तक्रारी आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने (FSDA) तात्काळ कारवाई केली.
एका पथकाने सम्राट ढाब्यावर छापा टाकला. तपासणीत घाण आणि निष्काळजीपणा असल्याचे असंख्य पुरावे आढळून आले. त्यानंतर, प्रशासनाने तात्काळ ढाबा सील केला. अधिकाऱ्यांनी ढाब्यातील अन्न आणि पेय पदार्थांचे नमुने देखील गोळा केले, जे चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. चाचणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
या घटनेनंतर जनतेमध्ये भीती आणि संताप दोन्ही जाणवत आहेत. लोक म्हणतात की, जर प्रसिद्ध रेस्टॉरंट्सची स्थिती इतकी वाईट असेल तर लहान रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समधील स्थितीची कल्पनाच करायला नको. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने महामार्गालगतच्या सर्व रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सची नियमितपणे तपासणी करावी अशी लोकांची मागणी आहे.