David Warner KGF 2, IPL 2022: डेव्हिड वॉर्नर बनला KGF-2 मधला 'रॉकी भाई'! कोणता डायलॉग म्हणाला पाहा, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:39 IST2022-04-20T12:35:49+5:302022-04-20T12:39:42+5:30
वॉर्नरचा 'रॉकी भाई' अवतार तुम्ही पाहिलात का?

David Warner KGF 2, IPL 2022: डेव्हिड वॉर्नर बनला KGF-2 मधला 'रॉकी भाई'! कोणता डायलॉग म्हणाला पाहा, Video व्हायरल
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आणि दिल्ली कॅपिटल्सचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर कायम चाहत्यांचे सोशल मीडियावर मनोरंजन करताना दिसतो. बॉलिवूड असो किंवा दाक्षिणात्य चित्रपट असोत, वॉर्नर त्या चित्रपटातील ट्रेंडिंग गोष्टींशी संबंधित काही ना काही सोशल मीडियावर पोस्ट करत राहतो. आताही त्याने तसंच काहीसं केलं आहे. वॉर्नर सध्या KGF-2 या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'रॉकी भाई'च्या अवतारात दिसला आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यात तो केजीएफ मधील 'व्हायलन्स' वाला डायलॉग म्हणताना दिसला. पाहा व्हिडीओ-
वॉर्नरच्या या व्हिडीओ त्याची पत्नी कँडिस वॉर्नर हिने भन्नाट रिप्लाय दिला. 'हा वाला व्हिडीओ इतरांपेक्षा जास्त छान आहे', अशी कमेंट तिने केली. दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे आणि तो त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. वॉर्नर हॉलिवूड चित्रपटांपेक्षा बॉलीवूड आणि टॉलिवूड चित्रपटांमध्ये जास्त रस दाखवतो. या आधीही त्याने अनेक गाणी रिक्रिएट केली आहेत. तसेच वॉर्नर डायलॉग्स म्हणतानाही अनेकदा दिसला आहे. त्याच्या या कृतीमुळे वॉर्नरचे भारतात खूप चाहते आहेत.
IPL 2022 बद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबादने मधल्या हंगामात वॉर्नरला संघातून वगळले होते. प्रेक्षक गॅलरीत बसून सामना पाहणाऱ्या वॉर्नरने यंदाच्या हंगामात मात्र जोरदार पुनरागमन केले. मेगालिलावात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला दिल्लीने 6 कोटी 25 लाखांच्या किमतीला विकत घेतले. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जनेही वॉर्नरला विकत घेण्यासाठी स्वारस्य दाखवले होते. पण अखेर वॉर्नर दिल्लीकर झाला. सध्या दिल्लीकडून तो पृथ्वी शॉ च्या साथीने दमदार कामगिरी करताना दिसत आहे.