धावत्या ट्रेनवर धोकादायक स्टंट करणे महागात पडले; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 14:48 IST2024-01-28T14:47:30+5:302024-01-28T14:48:03+5:30

व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

dangerous stunts on a running train, Shocking video gone viral | धावत्या ट्रेनवर धोकादायक स्टंट करणे महागात पडले; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...

धावत्या ट्रेनवर धोकादायक स्टंट करणे महागात पडले; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...

Train Viral Video: सोशल मीडियावर ट्रेनशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ ट्रेनमध्ये किंवा ट्रेनवर चढून स्टंटचे असतात. अशा स्टंटबाजीमध्ये अनेकदा जावही जातो. दरम्यान, असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एक तरुण ट्रेनच्या खिडकीतून बाहेर डोकावतो आणि स्टंट करू लागतो. 

ट्रेनमधून बाहेर डोकावू नये किंवा धोकादायक कृत्य करू नये, यासाठी अनेकदा रेल्वे प्रशासनाकडून अलर्ट केले जाते. तरीदेखील काहीजण फक्त शोबाजी म्हणून किंवा सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी ट्रेनवर स्टंट करतात. पण, अनेकदा यात स्टंट करणाऱ्याचा जीव जातो. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तरुण धावत्या ट्रेनवर स्टंट करताना दिसतोय.

यावेली अचानक त्यला ट्रेनच्या हाय-व्होल्टेज तारांचा धक्का बसून तो बेशुद्ध पडतो. सुदैवाने त्याचे प्राण वाचले, पण त्याचा एक हात आणि शरीर गंभीररित्या भाजले गेले. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @gillujojo नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. केवळ 58 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 35 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहणारे युजर्स त्यावर विविध प्रतिक्रिया देऊन आश्चर्य व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'जिवंत राहिला, हीच खूप मोठी गोष्ट आहे.' दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'यमराज यावेळी सुट्टीवर असावेत, त्यामुळेच त्याचा जीव वाचला.'

Web Title: dangerous stunts on a running train, Shocking video gone viral