सापांचा झक्कास डान्स पाहून म्हणाल, 'वाह क्या बात है!', व्हिडीओ व्हायरल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 16:37 IST2020-03-15T16:27:35+5:302020-03-15T16:37:48+5:30

गोल्फ कोर्सच्या दोन सापांच्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियार खूप व्हायरल होताना दिसत आहे. 

Dancing of Two rat snakes at a golf course video goes viral myb | सापांचा झक्कास डान्स पाहून म्हणाल, 'वाह क्या बात है!', व्हिडीओ व्हायरल....

सापांचा झक्कास डान्स पाहून म्हणाल, 'वाह क्या बात है!', व्हिडीओ व्हायरल....

डान्स करायला सगळ्यांनाच आवडत असतं. तुमचा विश्वास बसणार नाही पण सापांना सुद्धा नाचावसं वाटत असतं. आज आम्ही तुम्हाला डान्स करत असलेल्या दोन सापांच्या व्हिडीओ दाखवणार आहोत.  गोल्फ कोर्सच्या  दोन सापांच्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियार खूप व्हायरल होताना दिसत आहे. 

३६ सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. वसुधा वर्मा नावाच्या एका ट्विटर युजरनं तिच्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरस होत आहे. आतापर्यंत ९ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन साप डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्सच्या कमेंट पाहायला मिळत आहेत.

वसुधा वर्मा यांनी हा व्हिडीओ शेर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, गोल्फ कोर्सचा एक कोपरा डान्स फ्लोअर झाला आहे. हे खूपच सुंदर आणि संतुलित आहे... हे एक नैसर्गिक सौंदर्य आहे. त्यांनी काही इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अधिकाऱ्यांना टॅग केलं आहे. या व्हिडीओला ट्विटर युजर्सनी पसंती दर्शवली आहे. 

Web Title: Dancing of Two rat snakes at a golf course video goes viral myb