शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Threat to Dalit Family: दलित मुलाने मंदिरातील देवाच्या मूर्तीला लावला हात, कुटुंबीयांना ठोठावला मोठा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 19:34 IST

देशात अस्पृश्यतेला अजिबात थारा नाही असे नेहमी बोलले जाते, मात्र सध्या अशाच एक घटनेने खळबळ माजली आहे,

नवी दिल्ली : देशात अस्पृश्यतेला अजिबात थारा नाही असे नेहमी बोलले जाते. मात्र अस्पृश्यतेच्या अशा घटना नेहमी समोर येत असतात. सध्या अशीच कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका दलित मुलाने मंदिरातीलहिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श केला. यानंतर पुन्हा गदारोळ झाला आणि मुलाच्या कुटुंबाला तब्बल साठ हजारांचा जबर दंड ठोठावण्यात आला आहे. 

दरम्यान, ही घटना कर्नाटक राज्यातील कोप्पल जिल्ह्यातील असल्याचे बोलले जात आहे. इथे एका दलित कुटुंबाला साठ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. खरं तर एका दलित मुलाने हिंदूच्यामंदिरात प्रवेश करून मूर्तीला स्पर्श केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही घटना समोर येताच परिसरात खळबळ माजली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मालूर तालुक्यातील हुल्लेरहल्ली गावात ही मिरवणूक निघणार होती, त्याचवेळी मुलाने तिथल्या मूर्तीला स्पर्श करून ती उचलण्याचाही प्रयत्न केला. हा सगळा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी पाहिला आणि त्यांना खटकला. ही मूर्ती उत्सवासाठी तयार करण्यात आली होती.

पंचायचीने ठोठावला दंड घटनेनंतर तेथील उपस्थित ग्रामस्थांनी प्रथम त्या मुलाला हुसकावून लावले आणि नंतर हे प्रकरण स्थानिक पंचायतीपर्यंत पोहोचले. पंचायतीने आपल्या आदेशात मुलाच्या कुटुंबाला साठ हजार रुपयांचा दंड ठोठावला. जोपर्यंत दंड भरला जात नाही तोपर्यंत संबंधित मुलगा गावात येऊ शकत नाहीत, असेही सांगण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही लोकांनी संबंधित मुलाच्या कुटुंबीयांना फोनवरून धमकी दिली आहे. 

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकDalit assaultदलितांना मारहाणHinduहिंदूTempleमंदिर