काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:55 IST2025-06-23T13:54:00+5:302025-06-23T13:55:39+5:30

Cylinder Gas Leak Video: सोशल मीडियावर या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Cylinder Gas Leak Video: A huge explosion occurred within a few moments, watch the shocking | काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video

काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video

Cylinder Gas Leak Video: तुम्ही घरगुती सिलिंडरचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. सध्या अशाच प्रकारच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सिलिंडरमधून गॅस गळती झाल्यानंतर एक महिला घराबाहेर पळताना दिसते, परंतु काही वेळाने ती परत घरात येते, तेवढ्यात भीषण स्फोट होतो. सुदैवाने या घटनेत महिलेला काही इजा झाली नाही. व्हिडिओचे कुठला आहे आणि आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.

व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक महिला स्वयंपाकघरातून गॅस गळती होणारे सिलिंडर बाहेर ओढताना दिसते. परंतु, गॅस गळती जास्त झाल्यामुळे ती सिलिंडर तिथेच सोडून पळून जाते. सिलिंडरला जोडलेल्या पाईपमधून गॅस वेगाने बाहेर पडत असल्याचे स्पष्टपणे व्हिडिओत दिसत आहे. काहीवेळानंतर गॅस बाहेर पडण्याचे बंद होते. 

काही वेळानंतर महिला दुसऱ्या दाराने पुन्हा घरात येते. एक पुरुषही गॅस गळती पाहण्साठी घरात येतो. पण, तेवढ्यात भीषण स्फोट होऊन सर्वत्र आग लागते. यानंतर दोघेही तात्काळ घरातून पळून जातात. या घटनेची भीषणता व्हिडिओ पाहूनच समजून येईल. सुदैवाने महिला किंवा त्या पुरुषाला गंभीर इजा झाली नाही. घराचे खिडक्या आणि खोलीचे दार उघडे असल्याने फारसे नुकसान झाले नसल्याचे मानले जाते.

हा व्हिडिओ घर के कलेश नावाच्या एक्स अकाउंटवरुन 22 जून रोजी पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडिओला आतापर्यंत 17.7 मिलियनहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. तसेच, या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि विविध कमेंट्सही करण्यात आल्या आहेत. 
 

Web Title: Cylinder Gas Leak Video: A huge explosion occurred within a few moments, watch the shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.