सायकल स्टंट करताना मुलीची झाली फजिती, एका चाकावर तोलत होती सायकल अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 19:31 IST2021-12-12T19:29:31+5:302021-12-12T19:31:49+5:30
एक स्टंटचा किंबहुना फिसकटलेल्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी वेगाने सायकल चालवत येते आणि अचानक ब्रेक दाबते. तिचा हा स्टंट आपल्याला एकदम थक्क करणारा वाटतो, तेवढ्यात तिच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरते.

सायकल स्टंट करताना मुलीची झाली फजिती, एका चाकावर तोलत होती सायकल अन्...
स्टंट (Stunt) करणं ही फार सोपी गोष्ट नसते. त्यासाठी खूप मेहनत लागते. खूप दिवसांचा सराव लागतो. तो सादर करण्याता आत्मविश्वास लागतो. एवढं करूनही फायनल स्टंटचा व्हिडिओ करताना काही पचका झाला तर तसाच्या तसा व्हिडिओ व्हायरलदेखील होऊ शकतो बरं का.. असाच एक स्टंटचा किंबहुना फिसकटलेल्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी वेगाने सायकल चालवत येते आणि अचानक ब्रेक दाबते. तिचा हा स्टंट आपल्याला एकदम थक्क करणारा वाटतो, तेवढ्यात तिच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरते.
या व्हिडिओमध्ये एका मुलीचा स्टंट चांगला झाला असतानाच आणखी एका सायकल चालक मुलाची एंट्री होते आणि सगळा प्लॅन फिसकटतो. मुलीच्या सायकलचे एक चाक वर असतानाच मागूनही आणखी एक सायकलवाला येतो. तो ब्रेक लावायलाच विसरतो आणि समोर उभ्या असलेल्या मुलीला वेगात टक्कर देतको. त्यानंतर दोघेही धाडकन् पडतात. अचानक झालेल्या या घटनेत मुलीच्या सायकलला काही होत नाही, पण बिचाऱ्या मुलाच्या सायकलचे दोन तुकडे होतात. असे असूनही शेवटी दोघेही पटकन् उठून उभे राहतात. नंतर काही घडलेच नाही असे दाखवतात.
\या विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला best.failsever नावाच्या आयडी द्वारे शेअर केले जात आहे. तसेच पुढे लिहिले आहे की, ”बाइक्सना ब्रेक नाही, हे स्वाभाविकच आहे..” या व्हिडिओला आतापर्यंत २ लाख ८४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर असंख्य विनोदी प्रतिक्रियादेखील मिळाल्या आहेत. एका यूझरने तर लिहिलंय, त्याने तर मुलीच्या स्टंटवर पाणीच फेरले. तर दुसऱ्याने लिहिले, रस्ता एवढा रुंद आहे, पण मागून येणारा सायकलस्वार खरंच आंधळा असेल…