जरा मेरा मुखड़ा देखो! चिमुकल्याचा 'छोटा पंडित' अवतार बघून व्हाल लोटपोट, राजपाल यादवला विसराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:10 IST2025-08-07T17:10:17+5:302025-08-07T17:10:58+5:30
Chota Pandit Child Video : व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आपण छोट्या पंडितचं छोटं व्हर्जन बघू शकता. एक छोटसं बाळ छोट्या पंडितच्या गेटअपमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

जरा मेरा मुखड़ा देखो! चिमुकल्याचा 'छोटा पंडित' अवतार बघून व्हाल लोटपोट, राजपाल यादवला विसराल
Chota Pandit Child Video : अक्षय कुमार, विद्या बालनचा 'भूल भुलैया' सिनेमा आपण पाहिला असेलच. तर हा सिनेमा आपण पाहिला असेल तर यातील राजपाल यादवनं केलेली छोटा पंडितची भूमिका तर नक्कीच लक्षात असेल. ही भूमिका अशी होती की, ज्याचे मीम्स आजही सोशल मीडियावर व्हायरल होतात. या भूमिकासाठी राजपाल यादवनं केलेला लूकही भन्नाट होता. ही छोटी भूमिका सिनेमातील सगळ्यात लोकप्रिय भूमिकांपैकी एक होती. सध्या सोशल मीडियावर राजपाल यादव तर नाही, पण छोट्या पंडितचं छोटं व्हर्जन चांगलं धुमाकूळ घालत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आपण छोट्या पंडितचं छोटं व्हर्जन बघू शकता. एक छोटसं बाळ छोट्या पंडितच्या गेटअपमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. लांब शेंडी, ओठांवर मस्तीखोर हास्य आणि चेहऱ्यावर लावलेला लाल रंग बाळाचा हा अवतार बघून लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलत आहे.
बाळाकडे बघूनच समजतं की, ते चांगलंच मस्तीखोर आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक क्यूटनेसही आहे जी आपल्या चेहऱ्यावर हसू खुलवते. त्याच्याकडे बघून कुणालाही त्याचा लाड करण्याचा मोह आवरणार नाही. इतका तो क्यूट दिसत आहे. त्याचा लूक सेम सिनेमातील छोट्या पंडितसारखाच करण्यात आलाय. त्याला शेंडी तर आहेच, सोबच मिशी देखील काढली आहे. हातात-गळ्यात माळा आहेत.
इन्स्टाग्रामवर @itsme_aaviii नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. ज्यावर यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. लोकांनी बाळाच्या लूकची आणि त्याच्या क्यूटनेसचं भरभरून कौतुक केलं आहे.