धक्कादायक! रेस्टॉरंटमध्ये महिलेनं मागवला बर्गर; पहिल्याच घासात सापडलं माणसाचं बोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 17:20 IST2021-09-17T17:15:39+5:302021-09-17T17:20:42+5:30
रेस्टॉरंटमध्ये चिकन बर्गर खाताना त्यात सापडलं माणसाचं बोट; महिलेनं केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! रेस्टॉरंटमध्ये महिलेनं मागवला बर्गर; पहिल्याच घासात सापडलं माणसाचं बोट
एका महिलेनं फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये चिकन बर्गर ऑर्डर केला. ती बर्गर खायला सुरुवात करणार, त्याआधी एक धक्कादायक गोष्ट तिच्या नजरेस पडली. बर्गर खाताना असं काही घडेल याची कल्पनादेखील त्या महिलेनं केली नव्हती. बोलिव्हियातल्या एस्टेफनी बेनिटेजनं तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार फेसबुकवर शेअर केला आहे. डेली मेलनं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
बोलिव्हियात वास्तव्यास असलेली एस्टेफनी बेनिटेज एका फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये बर्गर खाण्यासाठी गेली होती. तिनं पहिला घास खाल्ला. त्यावेळी तिला काहीतरी कडक वस्तू लागली. त्यामुळे बेनिटेजनं बर्गर नीट तपासून पाहिला. बर्गरमध्ये माणसानं बोट पाहून तिला धक्काच बसला. रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या घटनेचं चित्रिकरण करून तिनं व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ आतापर्यंत ६० हजारहून अधिक जणांनी पाहिला आहे. बर्गरमध्ये सापडलेल्या बोटांचे फोटोदेखील बेनिटेजनं शेअर केले आहेत.
स्पीड किती आहे रे? नितीन गडकरी सुस्साट वेगानं मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेची चाचणी करतात तेव्हा...
तयार बर्गर थेट रेस्टॉरंटमध्ये पोहोचतात. आमच्यासोबत कधीही असा प्रकार घडलेला नाही, असं रेस्टॉरंटमधल्या एका ग्राहकानं सांगितलं. बेनिटेजची पोस्ट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकांनी ते शेअर केले आहेत. या घटनेवर बर्गर कंपनीनं प्रतिक्रिया दिली आहे. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. काम करताना एका कर्मचाऱ्याचं बोट कापलं गेलं, असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.