VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 15:08 IST2025-09-11T15:07:52+5:302025-09-11T15:08:28+5:30
crocodile hippo fight video : पाणघोडा (हिप्पो) आणि मगर यांच्यातील संघर्षाचा व्हिडीओ तुफान चर्चेत

VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
crocodile hippo fight video : सोशल मीडियावर हल्ली जंगलातील वन्यप्राण्यांचे किंवा नदीकाठच्या प्राण्यांचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात. बरेच वेळा आपल्याला दिसते की लहान प्राणी मोठ्या आणि धोकादायक प्राण्यांचे भक्ष्य बनतात. परंतु काही प्राणी असेही आहेत, जे त्या प्राण्यांना पुरून उरतात आणि काँटे की टक्कर देत त्यांची आक्रमणे परतवून लावतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात पाणघोडा (हिप्पो) आणि मगर यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला आहे.
मगर हा पाण्यातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. तर दुसरीकडे पाणघोडा हा पाण्यातील शक्तिशाली जलचर असतो. या दोघांमध्ये अचानक संघर्ष होतो, परंतु परिणाम असा होतो की पाहणारेही आश्चर्यचकित होतात. हा व्हायरल व्हिडिओ नदीकाठापासून सुरू होतो. एक मगर पाण्याबाहेर विश्रांती घेत असताना अचानक एक पाणघोडा पाण्यातून बाहेर येतो आणि तिच्यासमोर थांबतो. पाणघोड्याकडे पाहून मगर संतापते आणि मोठा जबडा उघडू लागते. ती पाणघोड्यावर हल्ला करण्याचा विचार करत असतानाच, पाणघोडा आपला मोठा जबडा उघडतो आणि मगरीला घाबरवतो. पाणघोड्याचा जबडा पाहून मगर घाबरते आणि तेथून गपचूप पाण्यात निघून जाते. पाहा व्हिडीओ-
Everyone recognizes a psycho when they see one pic.twitter.com/ZQY1gcYhHo
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) September 9, 2025
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @AMAZlNGNATURE या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. हा फक्त १३ सेकंदांचा व्हिडिओ आहे, पण या व्हिडीओची लाखो लोकांमध्ये चर्चा रंगली आहे. लोक व्हिडीओवर रंजक प्रतिक्रियाही देत आहेत.