विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला, पंखावर जाऊन केली मस्ती; Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 22:03 IST2023-08-30T22:02:19+5:302023-08-30T22:03:39+5:30

क्रू मेंबर्सनी विमानाच्या पंखावर जाऊन केले फोटोशूट.

Crew Member Pose On Aeroplane Wing, Watch Viral Video | विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला, पंखावर जाऊन केली मस्ती; Video व्हायरल...

विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला, पंखावर जाऊन केली मस्ती; Video व्हायरल...

Crew Member On Plane Wing: विमानात प्रवाशांनी गोंधळ घातल्याचे किंवा विचित्र कृत्य केल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात चक्क विमानातील क्रू विचित्र कृत्य करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांना कडक शब्दात फटकारले. 

व्हायरल व्हिडिओमध्ये विमानतळावर बोईंग 777 विमान दिसत आहे. यावेळी क्रू मेंबर्स विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडून, विमानाच्या पंखावर येतात. यावेळी ते वेगवेगळ्या पोझ देऊन फोटोही काढतात. विमान कंपनीने सांगितले की, त्यावेळेस विमानात एकही प्रवासी नव्हता. पण, एअरपोर्टवरील इतर प्रवाशांनी क्रू मेंबर्सचे हे कृत्य पाहिले आणि आपल्या मोबाईलमध्ये शूट केले.

25 ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या व्हिडिओला 1 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर 5 हजार लोकांनी लाइकही केला आहे. या व्हिडिओ यूजर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले- त्यांचा पहिला दिवस असेल. दुसर्‍याने कमेंट केली- त्यांना त्यांच्या जीवाची पर्वा नाही का? अशाच प्रकारच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत.

Web Title: Crew Member Pose On Aeroplane Wing, Watch Viral Video