किळसवाणं! तुम्हीही क्रीम रोल आवडीने खाताय? व्हायरल Video पाहून पुन्हा लावणार नाही हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 17:20 IST2026-02-27T17:19:09+5:302026-02-27T17:20:04+5:30

क्रीम रोलचं नाव ऐकताच लोक बालपणातील आठवणीत हरवून जातात, पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या त्या गोड आठवणी नक्कीच कडू होऊ शकतात.

cream roll viral video dirty preparation shocking | किळसवाणं! तुम्हीही क्रीम रोल आवडीने खाताय? व्हायरल Video पाहून पुन्हा लावणार नाही हात

किळसवाणं! तुम्हीही क्रीम रोल आवडीने खाताय? व्हायरल Video पाहून पुन्हा लावणार नाही हात

सोशल मीडियावर दररोज कोणता ना कोणता नवीन व्हिडीओ चर्चेत असतो. कधी कोणाचा डान्स लोकांना हसवतो, तर कधी एखादी अनोखी 'फूड क्लिप' चर्चेचा विषय ठरते. खाण्यापिण्याशी संबंधित व्हिडीओ नेहेमीच लोकांचं लक्ष वेधून घेतात, परंतु अनेकदा अन्न बनवण्याची प्रक्रिया पाहून किळस देखील येते.

सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्याने लोकांच्या आवडत्या 'क्रीम रोल'बद्दल मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अनेकदा क्रीम रोलचं नाव ऐकताच लोक बालपणातील आठवणीत हरवून जातात, पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या त्या गोड आठवणी नक्कीच कडू होऊ शकतात.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, क्रीम रोल तयार करताना स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव आहे. ज्या बादलीमध्ये क्रीम ठेवली आहे, ती अत्यंत घाणेरडी दिसत आहे. क्रीम तयार करताना काही भाग खाली पडतो आणि कोणताही संकोच न बाळगता तो पुन्हा त्याच मिश्रणात टाकला जातो. कामगारांच्या तोंडाला मास्क नाही आणि ते उघड्या व अस्वच्छ हातांनी क्रीम भरताना दिसत आहेत. हे संपूर्ण दृश्य पाहून अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली असून अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

हा व्हिडिओ 'X' प्लॅटफॉर्मवर @ChapraZila नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्ट करताना युजरने लिहिले की, आता त्यांना समजलं आहे की क्रीम रोल इतक्या 'घाणेरड्या पद्धतीने' बनवले जातात, त्यामुळे ते पुन्हा कधीही हे खाणार नाहीत. हे विधान समोर येताच व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आणि हजारो लोक आपलं मतं मांडू लागले.

एका युजरने कमेंट केली की, तो आधीच पॅकेज्ड वस्तूंपासून लांब राहतो, कारण देशात भेसळ आणि स्वच्छतेचा अभाव ही सामान्य बाब आहे. जोपर्यंत तपासणी यंत्रणा कडक होत नाही, तोपर्यंत ग्राहकांचं आरोग्य धोक्यातच राहील असं त्याचं म्हणणं होतं. तर दुसऱ्या एका व्यक्तीने असा दावा केला की, बाजारात बनावट आणि निकृष्ट दर्जाचे क्रीम रोल विकले जात आहेत आणि ग्राहकांनी खरेदी करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. एका व्यक्तीने "लहानपणी मी हे खूप खायचो, आजही कधी कधी खातो, पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता कितीही भूक लागली तरी हे पुन्हा कधीच खाणार नाही" असं म्हटलं आहे. 

Web Title : घिनौना! क्या यह वीडियो देखने के बाद भी आप क्रीम रोल खाएंगे?

Web Summary : एक वायरल वीडियो में अस्वच्छ क्रीम रोल बनाने की प्रक्रिया का खुलासा हुआ है, जिससे खाद्य सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है। वीडियो में अस्वास्थ्यकर स्थितियां और संदिग्ध प्रथाएं दिखाई गई हैं, जिससे दर्शक इस लोकप्रिय व्यंजन पर सवाल उठाने और भविष्य में इससे बचने के लिए प्रेरित होते हैं।

Web Title : Disgusting! Will you still eat cream rolls after watching this video?

Web Summary : A viral video reveals unhygienic cream roll preparation, raising concerns about food safety. The video shows unsanitary conditions and questionable practices, leading viewers to question the popular treat and avoid it in the future.