भारीच! जोडप्यानं अनोख्या पद्धतीने साजरा केला लग्नाचा वाढदिवस; व्हिडीओ पाहून म्हणाल, क्या बात है...

By Manali.bagul | Updated: December 18, 2020 13:54 IST2020-12-18T13:53:41+5:302020-12-18T13:54:03+5:30

Trending Viral News in Marathi : सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नाचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण कुटूंबासह  साजरा केला आहे.

Couples unique wedding anniversary celebration beautiful video goes viral | भारीच! जोडप्यानं अनोख्या पद्धतीने साजरा केला लग्नाचा वाढदिवस; व्हिडीओ पाहून म्हणाल, क्या बात है...

भारीच! जोडप्यानं अनोख्या पद्धतीने साजरा केला लग्नाचा वाढदिवस; व्हिडीओ पाहून म्हणाल, क्या बात है...

लग्न आणि लग्नाच्या वाढदिवसाबाबत लोकांना नेहमीच खूप आकर्षण असतं. आपला लग्नाचा वाढदिवस खास असावा यासाठी सगळेचजण वेगवेगळे प्लॅन्स करतात आणि जुन्या आठवणींना उजाळा  देतात. अनेकदा आपल्या जोडीदाराला सरप्राईज देण्यासाठी महिला आणि पुरूष काही हटके करता येईल का याचा विचार करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जोडप्याबद्दल सांगणार आहोत. सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नाचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण कुटूंबासह  साजरा केला आहे.

अशी संकल्पना तुम्ही या आधी कधीही पाहिली नसेल. दक्षिण भारतातील जोडप्याने व्हिडीओच्या माध्यमातून लग्नानंतरचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. फुलांच्या साहाय्याने जमिनीवर वर्ष दर्शवण्यासाठी  रांगोळी काढली आहे.  एक- एक पाऊल पुढे जात आपला जीवनप्रवास दाखवत आहेत. जसजसं वर्ष पुढे जात आहेत. तसतसं त्यांना कुटूंबातील एक-एक व्यक्ती  जोडली जात आहे. शाब्बास पोरी! लॉकडाऊनमध्ये जेवण शिकली अन् ५८ मिनिटात ४६ पदार्थ बनवून केला विश्वविक्रम

हा व्हिडीओ @minimeens या ट्विटर युजरने १६ डिसेंबरला आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीले की, कोणीतरी आपल्या लग्नाचा वाढदिवस असा साजरा केला. आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ पाहिला  असून ११ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. २ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. लोकांना ही भन्नाट आयडीया आवडली असून त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. भारीच! नव्या तंत्राने शेती करायला घेतली, इतरांनी हलक्यात घेतलं; अन् ३ वर्षात पठ्ठ्याचं नशिबच पालटलं
 

Web Title: Couples unique wedding anniversary celebration beautiful video goes viral