कपलचा 'या' गाण्यावरील 'लय भारी' डान्स, विमान प्रवासातील व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 18:19 IST2023-03-21T18:15:57+5:302023-03-21T18:19:53+5:30
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांची त्यास पसंतीही मिळत आहे

कपलचा 'या' गाण्यावरील 'लय भारी' डान्स, विमान प्रवासातील व्हिडिओ व्हायरल
मुंबई - विमानात प्रपोज केल्याच्या किंवा विमानातच शुभ मंगल सावधान केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. विमानातील अनेक किस्से सोशल मीडियातून समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी एका वैमानिकांचे मधुर आवाजातील अनाऊंसिंग चांगलेच व्हायरल झाले होते. आता, विमान प्रवासात चक्क कपलने डान्स केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. लोकलमध्ये किंवा रेल्वे प्रवासात गमती जमती होत असतात, पण विमानात असं काही झाल्यास तो नक्कीच चर्चेचा विषय ठरतो. ३६,००० फूट उंचीवरुन विमान उडत असताना या कपने रोमँटीक गाण्यावर ठेका धरला होता.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांची त्यास पसंतीही मिळत आहे. या जोडप्याने ‘‘मान मेरी जान तुझे जाने ना दूंगा’’ या गाण्यावर डान्स केलाय. दोघांच्याही डान्सस्टेप अतिशय़ सुंदर असून लोकांना हा डान्स आवडलाय. दोघांचा पेहराव हा नव जोडप्याचा असल्यासारखाच आहे. विमानात या जोडप्यासह त्यांचे नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य असल्याचे दिसून येते. सर्वजण नवविवाहित जोडप्याला प्रोत्साहन देत आहेत.
जय करमानी नावाच्या एका युजर्सने हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यास, तब्बल ४ मिलियन्स व्ह्यूज मिळाले आहेत.