कपलने एका बॉटलच्या ट्रिकने बनवला रोमॅंटिक व्हिडीओ, १० कोटींपेक्षा जास्त मिळाले व्ह्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 12:45 IST2024-08-09T12:29:56+5:302024-08-09T12:45:11+5:30
Viral Video : सध्या एक वेगळा आणि रोमॅंटिक व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहिल्या व्हिडिओंपेक्षा खूप वेगळा आहे.

कपलने एका बॉटलच्या ट्रिकने बनवला रोमॅंटिक व्हिडीओ, १० कोटींपेक्षा जास्त मिळाले व्ह्यूज
Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या अचंबित करणाऱ्या गोष्टी बघायला मिळतात. अनेक अवाक् करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोक फेमस होण्यासाठी नको नको ते जुगाड करतात आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. अनेकदा काही क्रिएटीव्ह व्हिडीओ सुद्धा बघायला मिळतात. सध्या असाच एक वेगळा आणि रोमॅंटिक व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहिल्या व्हिडिओंपेक्षा खूप वेगळा आहे.
सध्या एक नवीन ट्रेंड आला आहे. ज्यात लोक एका पाण्याच्या बॉटलला काही छिद्र करतात आणि मग त्यात पाणी भरतात. पाणी भरल्यावर ही बॉटल दाबतात. तेव्हा पाणी कारंज्यासारखं बाहेर येऊ लागतं. याचे बरेच लोक रील्स बनवत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @ripon_deuri नावाच्या यूजरने शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १० कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तर ३६ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. लोक हा व्हिडीओ बनवणाऱ्या कपलचं कौतुकही करत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, कपल एका पिलरवर उभं आहे. तरूणाच्या हातात पाण्याने भरलेली बॉटल आहे. तरूणी त्याच्या मिठीत आहे. तेव्हाच तो एका हाताने बॉटल वर करतो आणि दाबतो. ज्यामुळे त्यातून पाणी सुंदररित्या बाहेर येतं. बॉटलमधील बाहेर येणारं पाणी आणि कपलची पोझ एखाद्या सिनेमातील रोमॅंटिक दृश्यासारखी वाटत आहे.