धावत्या ट्रेनमध्ये जोडप्याने बांधली लगीनगाठ; बघ्यांची मोठी गर्दी, पाहा अनोख्या लग्नाचा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 18:47 IST2023-11-27T18:43:51+5:302023-11-27T18:47:42+5:30
एवढ्या गर्दीसमोर न घाबरता दोघे एकमेकांना हार घालतात, यानंतर मुलगी त्याला मिठी मारते.

धावत्या ट्रेनमध्ये जोडप्याने बांधली लगीनगाठ; बघ्यांची मोठी गर्दी, पाहा अनोख्या लग्नाचा व्हिडिओ
Viral video: आजही भारतात बहुतांशे जोडपे अरेंज्ड मॅरेज करतात, म्हणजेच कुटुंबाच्या इच्छेनुसारच विवाह होतो. पण, अनेक धाडसी जोडपे लव्ह मॅरेज करायलाही तयार असतात. अशा लग्नांमध्ये कधी घरच्यांची संमती असते, तर कधी नसते. अशावेळी जोडपे पळून जाऊन लग्न करण्याचा मार्ग निवडतात. सध्या अशाच एका लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक जोडपे चक्क धावत्या ट्रेनमध्ये लग्न करताना दिसत आहे. यावेळी त्यांना पाहण्यासाठी ट्रेनमध्ये मोठी गर्दी जमते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, धावत्या ट्रेनमध्ये मुलगा मुलीच्या भांगेत सिंदूर भरतो. यानंतर मुलगी ट्रेनमध्ये लोकांसमोर त्याला मिठी मारते. नंतर तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि मग दोघेही एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. यानंतर ती मुलगी पुन्हा एकदा त्याला मिठी मारते आणि त्याच्या पायाला स्पर्श करते. यावेळी ट्रेनमधील इतर प्रवासी आपल्या मोबाईलमध्ये ही संपूर्ण घटना कॅप्चर करतात.
पाहा व्हिडिओ:-
ही घटना आसनसोल ते जसिडीह मार्गादरम्यान घडली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर max_sudama_1999 नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 48 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 3 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईकही केले आहे.