Video: तरूणीला पाठीवर बसवून क्रॉस करत होता नाला, मग जे झालं ते पाहून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 16:12 IST2021-12-31T16:10:25+5:302021-12-31T16:12:16+5:30
Viral Video : हा व्हिडीओ पाहून लोक पोट धरून हसत आहेत. कारण अटेंशन मिळवण्यासाठी एका तरूणाने असं काही केलं जे हैराण करणारं आहे.

Video: तरूणीला पाठीवर बसवून क्रॉस करत होता नाला, मग जे झालं ते पाहून व्हाल अवाक्...
Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार गोष्टी बघायला मिळतात. अनेकदा तर अशा गोष्टी बघायला मिळतात की, प्रयत्न करूनही हसू रोखता येत नाही. तर काही व्हिडीओ बघून हैराण व्हायला होतं. काही लोक मुद्दामहून असे व्हिडीओ बनवतात जेणेकरून त्यांची चर्चा व्हावी. अशातच एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक पोट धरून हसत आहेत. कारण अटेंशन मिळवण्यासाठी एका तरूणाने असं काही केलं जे हैराण करणारं आहे.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक तरूणी आणि एक तरूण सोबत जात आहेत. अचानक समोर एक नाला येतो. तरूण लगेच उडी मारून दुसऱ्या बाजूला जातो. पण तरूणी मागेच राहते. मग तरूण परत तिला आणण्यासाठी जातो. तो तिला आपल्या पाठीवर बसवतो. आणि नाल्यावरील एका वस्तूवरून चालू लागतो. पण दोघांच्या वजनाने त्यांचा बॅलन्स बिघडतो आणि दोघेही नाल्यात जाऊन पडतात.
हा व्हिडीओ पाहून लोक जोरजोरात हसत आहेत. लोक व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ 'i_love.surfing' नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून २२ हजारपेक्षा जास्त लोकांनी लाइक केला आहे. तर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.