CoronaVirus Viral Photo : This twitter thread will show you dedication of doctors | CoronaVirus : हृदयद्रावक! रात्रंदिवस ड्यूटी करून थकलेल्या नर्सचा फोटो व्हायरल; ती पण माणसंच, आता तरी काळजी घ्या

CoronaVirus : हृदयद्रावक! रात्रंदिवस ड्यूटी करून थकलेल्या नर्सचा फोटो व्हायरल; ती पण माणसंच, आता तरी काळजी घ्या

 देशात कोरोना व्हायरसनं कहर केलेला पाहायला मिळत आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती आणखी हाताबाहेर जात असल्याचं दिसून येत आहे. डॉक्टर्स आणि नर्स आपापलं काम करत आहेत. अशा स्थितीत सुविधांच्या अभावामुळे लोक आपला राग डॉक्टर आणि नर्स यांवर व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांचे मन भरून आले आहे. सध्या नर्सेस आणि डॉक्टरर्स गंभीर स्थितीचा सामना करत असल्याचं या फोटोवरून दिसून येतं. 

वंदना महाजन नावाच्या ट्विटर युजरनं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तुम्ही पाहू शकता एक नर्स दिवसभर काम केल्यानंतर थकवा आल्यामुळे एका कोपऱ्यात बसून विश्रांती घेत आहे. हा फोटो ट्विट  करताना कॅप्शन दिलं आहे की, मला कोविड झाला होता. त्यानंतर मी ६ दिवस इथे एडमिट होती.  हा माझ्यासोबत राहत असलेल्यांचा फोटो आहे.  जे लोक हे ट्विट वाचत आहेत ती सुद्धा माणसंच आहेत. 

बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा.....

ट्विटवर कॅप्शन लिहीताना त्यांनी नमूद केलं की, 'मी माझ्यासह ड्यूटीवर उपस्थितीत लोकांना विचारले की तुम्ही कधीपासून  ही ड्यूटी करत आहात. त्यावेळी त्यांनी सांगितले की, जेव्हापासून कोविड आला आहे तेव्हापासून. माझा मुलगा माझ्या पालकांसह  राहत आहे. काही दिवसांपूर्वी तो हॉस्टेलमध्ये राहत होता. मी अजूनही घरी जात नाही, आता त्याची  परिक्षा सुद्धा आहे. माझे पती परदेशातून ४ वर्षांनी परत येत आहेत. मला त्यांना आणण्यासाठी एअरपोर्टवर जाण्याची इच्छा होती. पण मला कोविड ड्यूटीमुळे जाता आलं नाही.' 

एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू! 

लोकांवर या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.  आतापर्यंत १५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या फोटोला लाईक केलं असून ५ हजारापेक्षा जास्त रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. वाढत्या कोरोनाच्या प्रसारात आरोग्य व्यवस्थांवर ताण येत असल्यामुळे लोकांना वारंवार काळजी घेण्याचं आवाहनं केलं जात आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Viral Photo : This twitter thread will show you dedication of doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.