Coronavirus: लॉकडाऊनमध्ये कायद्याची सक्ती करणारे पोलीस करतायेत 'हे' काम, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 01:35 PM2020-03-25T13:35:09+5:302020-03-25T13:41:02+5:30

या सगळयात मात्र पोलिसांचं काम वाढलं आहे. पोलिसांना २४ तास आपलं कर्तव्य पार पाडावं लागणार. अशातचं एक व्हिडीओ समोर आला आहे.

Coronavirus: police help homeless and the underprivileged during lockdown see video | Coronavirus: लॉकडाऊनमध्ये कायद्याची सक्ती करणारे पोलीस करतायेत 'हे' काम, व्हिडीओ व्हायरल

Coronavirus: लॉकडाऊनमध्ये कायद्याची सक्ती करणारे पोलीस करतायेत 'हे' काम, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे मृतांच्या आकड्यात वाढ होत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन  भारतात सुद्धा कोरोनापासून नागरीकांचा बचाव व्हावा यासाठी २१ दिवसांचा लॉक डाऊन करण्यात आला आहे.  म्हणजे कोणीही गरज नसताना घराबाहेर पडू शकत नाही. फक्त अत्यावश्क सेवा सुरू राहणार आहेत. नागरिक सुद्धा महत्वाच्या आणि जीवनावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडू शकतात. 

या सगळयात मात्र पोलिसांचं काम वाढलं आहे. पोलिसांना २४ तास आपलं कर्तव्य पार पाडावं लागणार. अशातचं एक व्हिडीओ समोर आला आहे. आणि या व्हिडीओतून पोलिस गरीबांना मदत करताना दिसून येत आहे. या व्हिडीओला  युजर्सनी चांगली पसंती दिली आहे. मोठ्या प्रमाणावर हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हा व्हिडीओ @Supriya23bh यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. पंजाबमधील पोलीस घरोघरी  जाऊन गरीबांना जेवण देत आहेत.  तसंच त्यांना रेशन सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. ज्या लोकांना रहायला घरसुद्धा नाही अशा लोकांसाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. बरेली पोलिसांनी सुद्धा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.  हा व्हिडीओ पाहून लोकांनी पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Web Title: Coronavirus: police help homeless and the underprivileged during lockdown see video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.