Coronavirus : People are wearing different costumes while lockdown api | Coronavirus : लॉकडाउनदरम्यान डायनासोर बनून घराबाहेर निघत आहेत लोक, पण का भौ?

Coronavirus : लॉकडाउनदरम्यान डायनासोर बनून घराबाहेर निघत आहेत लोक, पण का भौ?

कोरोनाच्या भीतीमुळे यूरोपातील काही देश लॉकडाउन झाले आहेत. या देशांमधील अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. काही व्हिडीओमध्ये लोक डायनोसोर बनून घराबाहेर निघताना दिसत आहेत. एका असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती डायनोसोरचे कपडे घालून मोकळ्या रस्त्यांवर फिरत आहे आणि अशातच पोलिसांची गाडी येते. Murcia Police ने हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केलाय. 

हा व्हिडीओ व्हायरल झाला असून कुणीतरी एडीट करून त्याला ज्युरासिक पार्क सिनेमाचं थीम म्युझिकही लावलं आहे. आतापर्यंत 40 लाख 86 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.

काही व्हिडीओमध्ये बघायला मिळालं की, त्यांच्या पाळीव प्राण्यांना बाहेर फिरायला घेऊन जाण्यासाठी लोक अशाप्रकारचे कपडे वापरत आहेत.


Web Title: Coronavirus : People are wearing different costumes while lockdown api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.