CoronaVirus : कोविडमुळे रुग्णालयात दाखल होता लेक; बाबांची तब्येत बिघडल्याचं कळताच Risk घेत खाली केला बेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 19:46 IST2021-04-30T19:25:42+5:302021-04-30T19:46:19+5:30
CoronaVirus : मयंक यांचे वडीलही कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांना रुग्णालयात दाखल करणं खूप गरजेचं होतं. अशावेळी मुलानं मदतीचा हात दिला आणि आपल्या वडीलांना बेड उपलब्ध करून दिला.

CoronaVirus : कोविडमुळे रुग्णालयात दाखल होता लेक; बाबांची तब्येत बिघडल्याचं कळताच Risk घेत खाली केला बेड
कोरोनामुळे संपूर्ण देशभरातील लोकांना गंभीर स्थितीचा सामना करावा लागत आहे. कोणी बेड मिळवण्यासाठी तर कोणी ऑक्सिजन सिलेंडर मिळवण्यासाठी वण वण फिरत आहे. या कठीण काळात कुटुंबातील लोक एकमेंकाना हिंमत देत आहेत. नोएडामधूनही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं कुटुंबातील लोकांचे महत्व पुन्हा एकदा नव्यानं पटवून दिलं आहे.
ग्रेटर नोएडातील मयंक प्रताप सिंह हे कोरोना पॉझिटिव्ह होते. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण जेव्हा मयंक यांच्या वडीलांची तब्येत बिघडल्याचं कानावर आलं, त्याचवेळी मयंक यांनी आपल्या वडीलांसाठी बेड खाली केला. आता मयंक आपले उपचार घरीच करत आहेत. त्याचे वडील रुग्णालयात दाखल आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार मयंक यांचे वडीलही कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांना रुग्णालयात दाखल करणं खूप गरजेचं होतं. अशावेळी मुलानं मदतीचा हात दिला आणि आपल्या वडीलांना बेड उपलब्ध करून दिला.
नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं
समोर आलेल्या माहितीनुसार ८ एप्रिलपासून मयंक कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली होती तसंच चेस्ट इन्फेक्शनही झाले होते. जसजसं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. त्याचवेळी त्यांचे वडील अगदी गंभीर अवस्थेत होते.
तरूणांसाठी लस घेणं कितपत सुरक्षित?; लसीकरणानंतर या गोष्टींची काळजी घ्या, तरच होईल बचाव
अशावेळी वडीलांना मदत करण्यासाठी मुलानं एका पत्रातून दावा केला की, मला काही झाले तर त्यासाठी मी स्वतः जबाबदार असेन. त्यानंतर बाबांना बेड उपलब्ध करून दिला. सध्या मयंक यांचे वडील उदय प्रताप सिंह आयसीयूमध्ये आहेत. अनेकदा प्रयत्न करूनही बाबांना बेड मिळत नसल्यानं मयंक यांना हे पाऊलं उचलावं लागलं.