Corona virus : कर्फ्यूमध्ये तंबाखूसाठी बाहेर आला अन् पोलिसांनी काय केलं बघा, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 15:34 IST2020-03-23T15:27:13+5:302020-03-23T15:34:42+5:30
कर्फ्यू असताना सुद्धा अनेक लोक सरकारच्या आदेशाला गांभिर्याने घेतलं नाही असं दिसून येत होतं.

Corona virus : कर्फ्यूमध्ये तंबाखूसाठी बाहेर आला अन् पोलिसांनी काय केलं बघा, व्हिडीओ व्हायरल
कोरोनाच्या जाळयात दिवसेंदिवस जास्तीत जास्त लोक अकडत आहेत. भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मोठ्या प्रमाणावर सुचना दिल्या जात आहेत. महाराष्ट्रात सुद्धा गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला होता.
Pune : Viral video pic.twitter.com/kF6TsozJe5
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) March 23, 2020
कर्फ्यू असताना सुद्धा अनेक लोक सरकारच्या आदेशाला गांभिर्याने घेतलं नाही असं दिसून येत होतं. पण ज्यांनी ज्यांनी सरकारच्या आदेशाचं पालन केलं नाही. त्या लोकांना पोलिसांनी बडवलं आहे. असाच एक व्हिडीयो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या तरुणाला तंबाखूची तलफ आल्यानं तो घराबाहेर पडला आहे. ( हे पण वाचा-कोरोना व्हायरसमुळे नरगिस फाखरीची उडाली घाबरगुंडी, मागतेय मदत)
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी एकीकडे नागरिकांसह प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना तंबाखूचं कारण सांगून हा तरुण बाहेर फिरत आला होता. याला वाहतूक पोलिसांनी दांड्यानं फटके देऊन घरी जायला लावलं . हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी पोलिसांनी दिलेल्या शिक्षेचं समर्थन केलं आहे. ( हे पण वाचा- Coronavirus : धक्कादायक! कोरोना व्हायरसच्या भीतीने मोठ्या भावाने घेतला लहान भावाचा जीव!)