Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे नरगिस फाखरीची उडाली घाबरगुंडी, मागतेय मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 01:12 PM2020-03-23T13:12:28+5:302020-03-23T13:13:01+5:30

नरगिस फाखरीने व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर मागितली मदत

Coronavirus: Nargis Fakhri Seeks Help, Admits She Has Been Wearing The SAME Clothes For 3 Days While In Self-Quarantine tjl | Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे नरगिस फाखरीची उडाली घाबरगुंडी, मागतेय मदत

Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे नरगिस फाखरीची उडाली घाबरगुंडी, मागतेय मदत

googlenewsNext

कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्व लोक घरात बंद आहेत. लोक आपल्या बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळत आहेत. ते स्वतःला स्वतःच्या घरात सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान सेलिब्रेटी घरात राहून आपला वेळ व्यतित करत आहेत. अभिनेत्री नरगिस फाखरीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ती कसा टाईमपास करते आहे ते सांगितलं होतं. आता तिने आणखीन एक व्हिडिओ शेअर करत तिची समस्या सांगितली आहे.


नरगिस फाखरीने सांगितले की, घरात राहून तिला खूप बोर होत आहे. तिने हेदेखील सांगितलं की गेल्या तीन दिवसांपासून ती एकाच कपड्यात आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, तीन दिवसांपासून मी एकाच कपड्यात आहे. हाच तो पॉइंट आहे? काय परिधान करतो आहे आणि किती वेळ घालत आहोत. जर आपण याचा विचार नाही केला तर आपल्याकडे खूप पैसे वाचली. का करत आहोत हे आपण सगळे.


काही दिवसांपूर्वी नरगिसने एक व्हिडिओ शेअर करत सांगितले होते. ती कशी टाईमपास करत आहे. तिने घराची सफाई करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत ती किचनमध्ये भांडी स्वच्छ करताना, टॉयलेट साफ करताना, झाडू मारताना व कपडे धुताना आणि फनी फेसेस बनवताना दिसली होती. नरगिस सध्या भारतात नाही तर कॅलिफोर्नियामध्ये आहे.


नरगिस फाखरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती शेवटची अमावस चित्रपटात दिसली होती. तिच्यासोबत या चित्रपटात सचिन जोशी व मोना सिंग हे कलाकार होते.

नरगिसला रॉकस्टार चित्रपटातून लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत झळकली होती.

Web Title: Coronavirus: Nargis Fakhri Seeks Help, Admits She Has Been Wearing The SAME Clothes For 3 Days While In Self-Quarantine tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.