धक्कादायक! कोरोना झालाय म्हणून घरमालकानं घरात जाऊ दिलं नाही, अख्खं कुटुंब २ दिवस राहिलं टॅक्सीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 12:54 PM2021-05-11T12:54:36+5:302021-05-11T12:59:11+5:30

corona positive wife in taxi : आपल्याही संसर्ग होईल या भीतीनं घर मालकानं त्यांना घराबाहेर ठेवलं असावं. या सगळ्यात मात्र रुग्ण महिलेला फार त्रास  सहन करावा लागला.

corona positive wife in taxi : Mandi corona virus in owener refused to take them home taxi driver lived with his corona positive wife in taxi | धक्कादायक! कोरोना झालाय म्हणून घरमालकानं घरात जाऊ दिलं नाही, अख्खं कुटुंब २ दिवस राहिलं टॅक्सीत 

धक्कादायक! कोरोना झालाय म्हणून घरमालकानं घरात जाऊ दिलं नाही, अख्खं कुटुंब २ दिवस राहिलं टॅक्सीत 

Next

सध्याच्या स्थितीत कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे  (Coronavirus Pandemic) संपूर्ण जगभरातील लोकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत अनेकांकडून मदतीचा हात पुढे येत आहे. तर काहीजण कोरोनाचं भांडवल बनवून लोकांना लूबाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच एक घटना हिमाचल प्रदेशच्या मंडी (Corona in Mandi) जिल्ह्यातून समोर आली आहे. 

पत्नीला कोरोना संसर्ग झाल्यामुळे एका टॅक्सी चालकाला घरमालकानं घरात येण्यापासून अडवलं. त्यामुळे हे कुटुंब तब्बल  ४८ तास  घराबाहेर टॅक्सीत बसून होतं. मंडी जिल्ह्यातील करसोग परिसरात परसराम नावाची व्यक्ती टॅक्सी चालवून घर सांभाळते. दोन दिवसापूर्वी पत्नीच्या तपासणीसाठी ते शिमला याठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. त्यांच्या पत्नीची स्थिती जास्त गंभीर नव्हती, त्यामुळे डॉक्टरांनी होम आयसोलेशनचा सल्ला दिला होता.

तुमचा तो टॉमी आणि आमचा कुत्रा? कुत्र्यावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

परसराम , कोरोनाबाधित पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलासह घरी परतले तेव्हा त्यांच्या घरमालकाने कोरोना संसर्ग झाल्यामुळे तुम्ही घरात यायचं  नाही असं सांगितलं. आपल्याही संसर्ग होईल या भीतीनं घर मालकानं त्यांना घराबाहेर ठेवलं असावं. या सगळ्यात मात्र रुग्ण महिलेला फार त्रास  सहन करावा लागला. अशा स्थिती आरामाची फार आवश्यकता असते. पण घर मालकाच्या नकारामुळे त्यांना २ दिवस बाहेरच टॅक्सीत राहण्याची वेळ आली. दोन दिवस ते तिथंच राहिले पण कोणीही मदतीला पुढे आलं नाही. 

 रस्त्यावर उभा राहण्याच्या वादातून तरुणावर कुऱ्हाड, चाकूनं प्राणघातक हल्ला

अखेर परसराम यांनी डीएसपी गीतांजली ठाकूर यांना संपर्क करून मदत मागितली. त्यानंतर पोलिसांना घरमालकाला समजावले. परसराम यांना क्वार्टरमध्ये पोहोचवलं आणि कुटुंबातील माणसांसाठी रेशनची व्यवस्थाही केली. गीतांजली ठाकूर यांनी सांगितले की, ''रविवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांना फोन आला होता. परसराम यांनी घडला प्रकार डीएसपींना ऐकवला आणि मदत करण्याची विनंती केली.''

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: corona positive wife in taxi : Mandi corona virus in owener refused to take them home taxi driver lived with his corona positive wife in taxi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app