तुमचा तो टॉमी आणि आमचा कुत्रा? कुत्र्यावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 11:35 PM2021-05-10T23:35:48+5:302021-05-10T23:45:06+5:30

Crime News : एका व्यक्तीने आपल्या शेजाऱ्यांना कुत्र्यावरून झालेल्या वादावरून बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्यांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. 

Your dog is Tommy and our dog is dog? Violent fight between two families over dogs | तुमचा तो टॉमी आणि आमचा कुत्रा? कुत्र्यावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

तुमचा तो टॉमी आणि आमचा कुत्रा? कुत्र्यावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

Next

गुरुग्राम - अगदी किरकोळ कारणांवरून शेजाऱ्यांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत गेल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. हरयाणामधील गुरुग्राम येथील एका व्यक्तीने आपल्या शेजाऱ्यांना कुत्र्यावरून झालेल्या वादावरून बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्यांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. 
  
या कुटुंबातील एका व्यक्तीने शेजाऱ्याच्या कुत्र्याला टॉमी या त्याच्या नावावरून न बोलावता कुत्रा म्हटल्याने हा शेजारी नाराज झाला आणि त्याने या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली.

ही घटना गुरुग्राममधील ज्योती पार्क येथे घडली आहे. त्याचे झाले असे की, या मारहाण करणाऱ्या शेजाऱ्याकडे असलेल्या कुत्र्यामुळे शेजारी राहणारे सुधीर नावाचे गृहस्थ त्रस्त होते. त्यांनी या कुत्र्याला साखळीने बांधून ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र आपल्या कुत्र्याला साखळीने बांधून ठेवायला सांगतात ही बाब या व्यक्तीला आवडली नाही. उलट आपल्या कुत्र्याचे टॉमी हे नाव न घेता त्याला कुत्रा म्हटले, त्यामुळे या व्यक्तीचा संताप अनावर झाला. त्यातून ही मारहाण घडली. 

सुधीर यांचे म्हणणे आहे की, हा कुत्रा चावा घेण्यासाठी अंगावर येत असल्याने त्यांनी या कुत्र्याला बांधून ठेवण्याची विनंती कुत्र्याच्या मालकाला केली होती. मात्र कुत्र्याला टॉमी म्हणण्याऐवजी कुत्रा म्हटल्याने कुत्र्याचा मालक नाराज झाला. त्याने सुधीर यांच्या कुटुंबीयांना काठी आणि रॉडने मारहाण केली. यात कुटुंबातील सहा जण जखमी झाले. त्यानंतर सुधीर यांनी गुरुग्राम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  

Web Title: Your dog is Tommy and our dog is dog? Violent fight between two families over dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app