अरे देवा! बेडखाली सापांची शेती! तरूणीनं बेडरूमलाच बनवलं स्नेक फार्म, बघा भयानक व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:04 IST2025-08-07T12:03:13+5:302025-08-07T12:04:09+5:30
Snake Farming In China: आधी तर ती मोठ्या सहज आणि शांतपणे गादी उचलते, तेव्हा गादीखाली शेकडो साप वळवळताना दिसतात.

अरे देवा! बेडखाली सापांची शेती! तरूणीनं बेडरूमलाच बनवलं स्नेक फार्म, बघा भयानक व्हिडीओ
Snake Farming In China: शेती म्हटलं की, डोळ्यांसमोर लगेच कापूस, तूर, सोयाबीन वेगवेगळी फळं, भाज्या, ऊस, ज्वारी, गहू इत्यादी इत्यादी गोष्टी येतात. पण सापांची देखील शेती असते, असा काही विचार आपण कधी केला नसेल. सोशल मीडियावर चीनमधील अनेक अजब उद्योगांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच सापांच्या शेतीचा एका व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात एका तरूणीनं तिच्या बेडरूममध्ये गादीखाली शेकडो साप पाळल्याचे दिसत आहे. आधी तर ती मोठ्या सहज आणि शांतपणे गादी उचलते, तेव्हा गादीखाली शेकडो साप वळवळताना दिसतात.
चीनमधील या तरूणीची खोली नेहमीच बंद राहत होती. कुणालाही आत जाण्याची परवानगी नव्हती. बेडवर नेहमीच गादी असायची. त्याखाली सापांचा अड्डा बनला आहे. काही कारणास्तव तरूणीच्या खोलीच्या दरवाजा उघडला गेला आणि गादी उचलण्यात आली तेव्हा समोर जे दिसलं ते पाहून लोक शॉक्ड झाले. शेकडो साप जमिनीवर आणि बेडवर वळवळत होते. इतके साप एकत्र दिसल्यावर कुणालाही घाम फुटेल. पण तरूणीसाठी हे साप सामान्य होते. तिने हे साप पाळले होते.
चीनमध्ये साप पाळण्याचा ट्रेण्ड काही नवीन नाही. येथील तरूण सहजपणे साप, पाल आणि कीटक पाळतात. शांघाय शहरात तर असे अनेक कॅफे आहेत, जिथे लोक साप, विंचू किंवा इतर जीवांसोबत वेळ घालवतात. यात जास्त सहभाग महिलांचा असतो. साप घरीही पाळले जातात. व्हिएतनामच्या डोंग स्नेक फार्म प्रमाणेच चीनमध्येही अनेक फार्म आहे जे सापांचं विष औषधं आणि अॅंटी-व्हेनम बनवण्यासाठी वापरतात. पण या तरूणीही बेडरूमला फार्म बनवण्याची ही पद्धत फारच भितीदायक होती.