आत्मनिर्भर चिंपाझी! कामवाल्या बाईलाही लाजवेल अशा थाटात कपडे धुतोय हा चिंपाझी, हसु आवरणं अशक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 15:11 IST2021-10-11T15:11:37+5:302021-10-11T15:11:53+5:30
चिंपांझी एक समजूतदार प्राणी समजला जातो. म्हणूनच चिंपाझींना अनेकदा मानवांप्रमाणे काम करताना पाहिले गेले आहे. सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिंपांझी चक्क कपडे धुत आहे.

आत्मनिर्भर चिंपाझी! कामवाल्या बाईलाही लाजवेल अशा थाटात कपडे धुतोय हा चिंपाझी, हसु आवरणं अशक्य
आपल्या सर्वांनाच माहीत आहे मानवाची उत्पत्ती माकडापासून झाली आहे. चिंपांझी एक समजूतदार प्राणी समजला जातो. म्हणूनच चिंपाझींना अनेकदा मानवांप्रमाणे काम करताना पाहिले गेले आहे. सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिंपांझी चक्क कपडे धुत आहे.
चिंपांझी कपड्यांना साबण लावतो, नंतर त्याच्या हातांनी घासण्यास सुरवात करतो. हा चिंपांझी अगदी माणसाप्रमाणेच कपडे धुवत आहे. हा व्हिडिओ इंटरनेट जगतात जोरदार शेअर केला जात आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनी वेगाने कमेंट करायला सुरुवात केली आहे. एका यूजरने कमेंट केली आहे की हा व्हिडीओ सिद्ध करत आहे की चिंपांझी खरोखर हुशार असतात. तर , दुसर्या यूजरने सांगितले की खरे चिंपांझी खरोखर माणसांसारखे कपडे धुवत आहे. हा व्हिडीओ helicopter_yatra हेलिकॉप्टर_यात्रा नावाच्या पेजवरून ४ दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आत्ता पर्यत ३ हजार ५०० हून अधिक लोकांनी लाईक केला आहे.