Viral Video: चिंपांझीवरही चढला पुष्पाचा फिव्हर, अल्लु अर्जुनची स्टेप कॉपी करत 'श्रीवल्ली'वर धरला ठेका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:13 IST2022-03-30T14:10:28+5:302022-03-30T14:13:28+5:30
फक्त माणसंच नव्हे तर आता प्राण्यांवरील पुष्पाचा फिव्हर चढला आहे. पुष्पाची स्टाईल मारणाऱ्या एका चिम्पाझीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Viral Video: चिंपांझीवरही चढला पुष्पाचा फिव्हर, अल्लु अर्जुनची स्टेप कॉपी करत 'श्रीवल्ली'वर धरला ठेका
सोशल मीडियावरपुष्पाचा (Pushpa Movie) ट्रेंड अद्यापही कायम आहे. फिल्ममधील गाण्याची हुक स्टेप्स असो, अभिनेता अल्लू अर्जुनचे (Allu Arjun) डायलॉग्स असो किंवा सिग्नेचर स्टेप्स हे सर्व जबरदस्त व्हायरल होत आहेत. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी आपला पुष्पा स्वॅग दाखवला आहे. फक्त माणसंच नव्हे तर आता प्राण्यांवरील पुष्पाचा फिव्हर चढला आहे. पुष्पाची स्टाईल मारणाऱ्या एका चिम्पाझीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Pushpa fever on Chimpanzee).
एका चिम्पाझीवर पुष्पाचा फिव्हर चढला आहे. त्यानेही आपला पुष्पा स्वॅग दाखवला आहे. पुष्पा फिल्ममधील फेमस गाणं म्हणजे श्रीवल्ली. या गाण्यातील अल्लु अर्जुनची स्टेप तुफान व्हायरल झाली (Chimpanzee dance on Pushpa shrivalli). सोशल मीडियावर याचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले. अशाच व्हिडीओपैकी हा एक व्हिडीओ आहे. ज्यात चिम्पाझीही श्रीवल्ली गाण्यावर नाचताना दिसला. या गाण्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसला.
श्रीवल्ली गाण्यात अल्लु अर्जुन लंगडताना दिसतो. असाच हा चिम्पाझीही लंगडतो आहे आणि बॅकग्राऊंडला श्रीवल्लीचं गाणं ऐकू येतं. या चिम्पाझीने अगदी अल्लू अर्जुनची स्टाइल मारली आहे. चिम्पाझीला असं डान्स करताना तुम्ही कदाचित पहिल्यांदाचा पाहिलं असेल. dinesh_adhi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ नेटिझन्सना आवडला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंटही येत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.