फारच क्यूट! पाय मोडलेल्या आईच्या मदतीसाठी धावून आला चिमुकला, काय केलं ते पाहून व्हाल थक्क...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:00 IST2026-03-18T15:50:31+5:302026-03-18T16:00:00+5:30

Cute Viral Video : एक क्यूट म्हणता येईल असा व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आपल्याला सुद्धा नक्कीच हा व्हिडीओ आवडेल.

Child tries to help his broken legs mother viral video will win your heart | फारच क्यूट! पाय मोडलेल्या आईच्या मदतीसाठी धावून आला चिमुकला, काय केलं ते पाहून व्हाल थक्क...

फारच क्यूट! पाय मोडलेल्या आईच्या मदतीसाठी धावून आला चिमुकला, काय केलं ते पाहून व्हाल थक्क...

Cute Viral Video : रिकामं बसून कंटाळा आला असेल, मन रमत नसेल किंवा कामाच्या ताणातून जरा फ्रेश व्हायचं असेल तर सोशल मीडियावर कितीतरी मूड फ्रेश करणारे व्हिडीओ बघायला मिळतात. सोशल मीडियावर असे असे व्हिडीओ बघायला मिळतात जे काही सेकंदात आपला कंटाळा घालवू शकतात. म्हणजे हे व्हिडीओ असे असतात, जे आपलं मनोरंजन तर करतातच सोबतच एखादा विचार देऊन जातात किंवा भावूक करून जातात. काही व्हिडीओ तर फारच क्यूट असतात. असाच एक क्यूट म्हणता येईल असा व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आपल्याला सुद्धा नक्कीच हा व्हिडीओ आवडेल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आपण बघू शकता की, एका महिलेचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि त्या पायावर प्लॅस्टर बांधलेलं आहे. महिला वॉकिंग स्टिकच्या मदतीने चालण्याचा प्रयत्न करत आहे. अशात महिलेचं डायपर घातलेलं चिमुकलं बाळ दुडूदुडू धावत येतं आणि आईची चालण्यास मदत करू लागतं. तो आईच्या दोन्ही पायांच्या मधे जातो आणि आईला घेऊन पुढे सरकतो, जणू त्याने आईला आपल्या खांद्यावर बसवलंय. या बाळाचं आपल्या आईवरील प्रेम आणि तिची काळजी घेण्याचा प्रयत्न ही बाब लोकांच्या मनाला भिडली आहे. तेव्हाच हा व्हिडीओ व्हायरल झाला.

हा व्हिडीओ एक्स प्लेटफॉर्मवर @iAKsSaviour नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलाय. तर याच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'बाळ फक्त आपल्या जखमी आईची मदत करण्याचा प्रयत्न करत आहे'. आतापर्यंत हा व्हिडीओ भरपूर लोकांनी पाहिलाय. तर अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं की, 'इंटरनेटवरील आजचा हा सगळ्यात सुंदर व्हिडीओ आहे'. तर दुसऱ्याने लिहिलं की, याला म्हणतात पुरूष. तिसऱ्याने लिहिलं की, हा फारच गोड आणि पॉवरफुल आहे. अशा बाळाच्या कौतुक करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया फोटोवर येत आहेत. 

Web Title : प्यारा! घायल माँ की मदद के लिए दौड़ा बच्चा, पिघला दिए दिल।

Web Summary : एक दिल को छू लेने वाला वीडियो एक बच्चे को फ्रैक्चर वाले पैर के साथ अपनी घायल माँ को चलने में मदद करते हुए दिखाता है। बच्चा उसका समर्थन करता है, प्यार और देखभाल का प्रदर्शन करता है, जिसने दर्शकों को मोहित कर लिया है और वायरल हो गया है, और इस मीठे इशारे के लिए प्रशंसा प्राप्त कर रहा है।

Web Title : Adorable! Toddler rushes to help injured mother, melts hearts.

Web Summary : A heartwarming video shows a toddler helping his injured mother walk with a fractured leg. The child supports her, demonstrating love and care, which has captivated viewers and gone viral, drawing praise for the sweet gesture.